मेमो ट्रेनमध्ये तरुण मयत स्थितीत आढळला

अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
 मेमो ट्रेनमध्ये तरुण मयत स्थितीत आढळला

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

भुसावळ येथून सुटणारी व इगतपुरी (Bhusawal Igatpuri) येथे जाणार्‍या अप मेमो ट्रेनमध्ये (up memo train) चाळीसगाव रेल्वे स्थानकादरम्यान (Chalisgaon Railway Station) एक २५ वर्षीय अनोळखी तरुण (unknown youth) मयतस्थितीत (dead condition) आढळुन आला आहे. प्रवाशांनी (Passengers) चाळीसगाव स्थानकावर माहिती (Given the information) दिल्याने, चाळीसगाव रेल्वे पोलिसांनी (Chalisgaon Railway Police) मृतदेह (dead body) रुग्णालयात (hospital) दाखल केला असून मयताची ओळख (identify) पटविण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भुसावळ-इगतपुरी अप मेमोमध्ये हि चाळीसगाव स्थानकावर आली असता प्रवशांनी रेल्वे पोलिसांना गाडीत एक तरुण बेशुध्द अवस्थेत पडलेला असल्याचे सांगीतले. रेल्वे पोलिसानी तात्काळ तरुणाला रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषीत केले.

तो सात ते आठ सातांपूर्वी मयत असल्याचे सांगीतले. याप्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सफौ.सुरेश महाजन करीत आहे. रेल्वे पोलिसांकडून मयताची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मयताची उंची ५ फुट ८ इंच, रंग सावळा, शरीर बांधा मध्यम, डोक्याचेे केस काळे मोठे, चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे बारीक, मिशी बारीक तसेच त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर ‘ सपना ’ असे इंग्रजीत गोंदलेले आहे.

मयताविषयी काही माहिती असल्यास चाळीसगाव रेल्वे पोलीस(०२५८९-२२३५८४) व तपासी अमलदार सुरेश महाजन(मो.९८५०१९३२७२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com