वाळूच्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने युवक जागीच ठार

वाळूच्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने युवक जागीच ठार

  पाचोरा Pachora प्रतिनिधी

    गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे ट्रॅ्क्टरचा (sand tractor) टायर फुटल्याने (tires burst) वाहन महामार्गावरील खांबावर आदळल्याने ट्रॅक्टर पल्टी होऊन चालकाच्या डोक्याला जबरी मार लागला त्यात २१ वर्षाचा युवक (youth) जागीच ठार (died) झाला.

वाळूच्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने युवक जागीच ठार
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण
वाळूच्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने युवक जागीच ठार
अल्पवयीन युवतीवर अत्याचार
वाळूच्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने युवक जागीच ठार
कुसुंब्याचे शेतकरी कुणाल शिंदे यांच्या अनोख्या प्रयोगाची होतेय चर्चा..

घटनेप्रकरणी पाचोरा येथील ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे,अपघाताची घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान भडगाव रोडवरील निर्मल रेसिडेन्सी जवळ घडली,मयत युवकाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ अमित साळुंखे यांनी केल्यानंतर मयतावर चिंचखेडा खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते.

     ‌चिंचखेडा खुर्द तालुका पाचोरा येथील पवन हिंमत पाटील वय २१ वर्षं हा कृष्णापूरी येथील एका इसमाने ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता, शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान गिरणा नदीपात्रातून वाळू भरुन पाचोरा शहराकडे भरधाव वेगाने येत असतांना हॉटेल निर्मल रेसिडेन्सी जवळ अचानक टायर फुटला,

त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॉक्टर चांदवड जळगाव महामार्गावरील इलेक्ट्रीक खांबावर आदळले व पल्टी झाले त्यात पवन हिंमत पाटील यांच्या डोक्याला व चेहऱ्याला जबरी मार लागला त्यात पवन हा जागेवर ठार झाला,

घटनेची माहिती ट्रॅक्टर मालक काही त्याचे साथीदारांना मिळताच त्यांनी तात्काळ तुटलेला खांब व वाळू दुसऱ्या वाहनात भरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला,पवन हा आई वडीलास एकुलता एक मुलगा होता,त्याचे वडील हिंमत पाटील हे सारोळा बुद्रुक येथील अविनाश देशमुख यांचेकडे मजूरी करतात,पवन यास एक बहिण व वृद्ध आई वडील आहेत.

वाळूच्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने युवक जागीच ठार
VISUAL STORY : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा हा लुक पाहाल तर... काळीज होईल खल्लास...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com