तरूण पिढीने नारळीकर, सुनिता विल्यम्स आणि जगदीश चंद्र बोस यांचा आदर्श घ्यावा..

नूतन मराठा महाविद्यालयात ऑनलाईन व्याख्यान मालेत मान्यवरांच्या अपेक्षा
nutan maratha college
nutan maratha college

जळगाव jalgaon

आजच्या तरूण (younger) पिढीने (generation) पहिल्या महिला अंतराळवीर सुनीता विल्यम्स, (Sunita Williams) विज्ञान कथाकार साहित्यिक जयंत नारळीकर ( Jayant Narlikar) आणि वनस्पती सजीव आहेत याचा शोध लावणारे शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस (Jagdish Chandra Bose.) यांचा आदर्श (Ideal) घ्यावा असा सूर नूतन मराठा महाविद्यालयात (Nutan Maratha College) आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेतून निघाला.

गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेल्या साहित्यिक मेजवानीत आज पहिल्या महिला अंतराळवीर सुनीता विल्यम्स, विज्ञान कथाकार साहित्यिक जयंत नारळीकर आणि वनस्पती सजीव आहेत याचा शोध लावणारे शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांचा जीवनप्रवास उलगडणार्‍या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

ऑनलाईन कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एस. ए. गायकवाड अध्यक्षस्थानी होते.

कार्यक्रमाच्या संयोजिका तथा मराठी विभाग प्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर यांनी स्वागत केले.

वनस्पतीशास्त्राच्या प्रा. यास्मिन जमादार यांनी सुनिता विल्यम्स यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना बालपणापासूनच जमीन आणि आकाशाकडे कुतुहलाने पाहणारी चिमुकली सुनिता पहिली महिला अंतराळवीर कशी झाली?, तीचं बालपण, शिक्षण, सामाजिक कार्य, मिळालेले वेगवेगळे पुरस्कार,सन्मान याबाबत मार्गदर्शन केले.

सुक्ष्मजीवशास्र विभागाच्या प्रा. प्रज्ञा कुलकर्णी यांनी विज्ञान कथा-कादंबरीकार तथा नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. खगोलशास्त्रज्ञ ते अलिकडच्या संम्मेलनाध्यक्ष पर्यंतचा त्यांचा प्रवास प्रा. प्रज्ञा कुलकर्णी यांनी प्रभावीपणे मांडला.

ते विज्ञानयात्री असले तरी मराठी भाषेची वाट समृद्ध करण्यात त्यांचं खुप मोठं योगदान आहे असंही त्यांनी सांगितलं.

वर्गात बसून खिडकीतून डोकावून झाडं कशी हलतात,त्यांना फुलं,पानं आणि फळं कशी लागतात अशा कितीतरी प्रश्नांबाबत विद्यार्थीदशेपासूनच जिज्ञासू असलेले आणि पुढे वनस्पती सजीव असतात याचा शोध लावणारे थोर शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांचा जीवनपट वनस्पतीशास्त्राच्या प्रा. नफीसा तडवी यांनी उलगडून दाखवला.

सचेतन आणि अचेतन या तत्त्वावर विपूल प्रमाणात साहित्य संपदा निर्माण करुन अनेक महत्वाचे पुरस्कार मिळवणारे जगदीश चंद्र बोस आपल्या मृत्यूनंतर माझी संपत्ती विकून संशोधन आणि सामाजिक कार्यासाठी खर्च करावी असे सांगून गेले यावरुन माणूस म्हणून देखील ते अतिशय संवेदनशील होते असंही प्रा .नफीसा तडवी यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. एस. ए. गायकवाड यांनी तीनही वक्तयांच्या मनोगतावर साधक बाधक चर्चा घडवून आणली. प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या म्हणजे साऊ ते जिजाऊ जयंती दरम्यान दहा दिवशीय कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणारी व्याख्यानमाला, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, आणि 25 जानेवारी पासून राज्यशास्त्र विभाग आयोजित सुरू झालेल्या राष्ट्रीय मतदार दिवस पंधरवडा यातून परिपूर्ण असा ज्ञानाचा खजिना विद्यार्थ्यांना मिळत असल्याचे सांगितले.

परिचय आणि सुत्रसंचलन मराठी विभागाचे प्रा. रत्नाकर कोळी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सुषमा तायडे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com