तरुणाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

रायसोनी नगरातील घटना; पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
तरुणाने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

रायसोनी नगरातील मुकेश सुभाष सोनार (वय-40) या तरूणाने घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

शहरातील रायसोनी नगरात मुकेश सोनार हा आई-वडील व मोठा यांच्यासह वास्तव्याला होता. हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता. बुधवारी दुपारी त्याची आई वडील कामा निमित्त बाहेर गेले होते. यावेळी घरात एकटा असलेल्या मुकेशने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याचे आईवडील हे घरी आले.

दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता मुकेशने गळफास घेतल्याचे दिसून आले. मुलाने आत्महत्या केल्याचे पाहून आईवडीलांनी हंबरडा फोडला. शेजारचांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. गेल्या काही महिन्यांपासून पत्नी आणि मुलगा हे माहेरी राहत होते. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास रेवानंद साळुंखे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com