गळफास घेवून तरुणाने संपविली जीवनयात्रा

सम्राट कॉलनीतील घटना; पोलिसात नोंद
गळफास घेवून तरुणाने संपविली जीवनयात्रा

जळगाव jalgaon ।

शहरातील सम्राट कॉलनी (Samrat Colony) परिसरात राहणार्‍या अरविंद देविदास इंगळे (Arvind Devidas Ingle) (वय-35) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या (Suicide by hanging) केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील सम्राट कॉलनीत अरविंद इंगळे हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून तो वेल्डिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. शनिवारी दि. 16 जुलै रोजी रात्री 10 वाजता घरात सर्वजण एकत्र जेवन करून झोपले होते. रात्रीच्या सुमारास त्याने घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. हा प्रकार त्याच्या घरच्यांना समजल्यानंतर त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. रविवारी सकाळी जिल्हा शायकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरविंद यांच्या पश्चात वडील देवीदास झोपा इंगळे, आई रंजना, मोठा भाऊ सुधिर आणि विवाहित बहिण असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com