जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांच्या गर्दीने मोडला विक्रम

सहा हजारावर पर्यटकांच्या भेटी...बसेसचा तुटवडा..
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांच्या गर्दीने मोडला विक्रम

सोयगाव,Soygaon

सलग सुट्या (Consecutive holidays) आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Amrit Mahotsava of Independence) मोफत दर्शन असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत (world famous Ajanta Caves) शनिवारी पर्यटकांच्या (tourists) गर्दीने उच्चांक गाठल्याने विक्रमी गर्दी (broke the record) झाली होती.त्यामुळे लेणी परिसरात प्रवेश करण्यासाठी बसेसचा तुटवडा भासल्याने पर्यटकांना तासंतास प्रतीक्षा करावी लागली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत विनामूल्य प्रवेश दि.१५ आगस्त पर्यंत देण्यात आलेला आहे त्यातच श्रावण महिन्मा आणि सलग सुट्या असल्याने शनिवारी तब्बल सहा हजाराच्या वर पर्यटकांनी अजिंठा लेणीला भेट दिली परंतु पर्यटकांच्या गर्दीमुळे शनिवारी अजिंठा लेणीत बसेस द्वारे प्रवेश करण्यासाठी मात्र तुटवडा भासल्याने तासंतास प्रतीक्षा करावी लागली होती..

सोयगाव आगाराला दोन लक्ष तेरा हजार उत्पन्न

जगप्रसिद्ध अजिंठा लेणीची वाहतूक सोयगाव आगाराकडे असून शनिवारी झालेल्या विक्रमी गर्दीमुळे सोयगाव आगाराला दोन लक्ष,तेरा हजाराची लॉटरी लागली होती अजिंठा लेणीत झालेल्या ३७० फेऱ्यांमधून एक हजार सहाशे कि मीच पल्ला पार करून उत्पन्न मिळाले आहे..

अजिंठा लेणीत बसेस वाढविण्याची मागणी

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरातील पर्यटकांच्या सेवेसाठी बसेसची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com