झाशीची राणी अन् ताराबाई शिंदे यांचे कर्तृत्व प्रेरणादायीच : प्रा. तेजस्विनी पाटील, प्रा. भाग्यश्री पाटील

नूतन मराठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सावित्रीबाई ते राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला
 झाशीची राणी  अन्  ताराबाई शिंदे यांचे कर्तृत्व प्रेरणादायीच :  प्रा. तेजस्विनी पाटील, प्रा. भाग्यश्री पाटील

जळगाव jalgaon

मै अपनी झाशी नही दुंगी! (Jhashi nahi dungi) हर हर महादेव (Har Har Mahadev) अशी गर्जना (Roar) करत आपल्या नावाप्रमाणेच खणखणीत आवाजात सुरुवात करणार्‍या प्रा.तेजस्विनी पाटील (Prof. Tejaswini Patil,) यांनी अवघ्या सभागृहाला आणि सभागृहात उपस्थित प्रेक्षकांना झाशीच्या राणीचं (Queen of Jhansi) हुबेहूब दर्शन (Exact philosophy) घडवलं.

Nutan Martha college logo
Nutan Martha college logo

नूतन मराठा महाविद्यालय आयोजित कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणार्‍या व्याख्यानमालेचा आज पाचवा दिवस.

आज झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि ताराबाई शिंदे अशा थोर कर्तृत्ववान महिलांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रा. तेजस्वीनी पाटील आणि प्रा. भाग्यश्री पाटील प्रमुख वक्त्या म्हणून व्यासपीठावर विराजमान होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील होते. संयोजिका प्रा. डॉ. इंदिरा पाटील यांनी जिजाऊ वंदना सादर केली.

व्याख्यानमालेचं पाचव़ं पुष्प गुंफताना पुत्र पाठीशी ढाल छातीशी कमरेला तलवार भारताचे निशाण आम्ही नाही सोडणार,स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार, या स्फुर्तीगीताप्रमाणेच प्रा. तेजस्वी पाटील यांनी राणी लक्ष्मीबाई सारखी वेशभूषा केली होती. आपल्या आवेशपूर्ण भाषणात त्यांनी झाशीची राणी थेट काळजापर्यंत पोहचवली होती.

एका हातात तलवार, दुसर्‍या हातात ढाल अन् पाठीशी आपलं ईवलंसं बाळ घेऊन त्या व्यासपीठावर आपल्या तेजस्वी नजरेणं, निखार्‍या प्रमाणे शब्दफेक करीत होत्या, जणू काही आपण त्याच काळात वावरत आहोत की काय असाच भास सर्वत्र होत होता..

व्याख्यानातील दुसर्‍या वक्त्या प्रा. भाग्यश्री पाटील यांनी जागतीक किर्तीच्या स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांच्या स्त्री पुरुष तुलना या जागतीक निबंध ग्रंथाच्या आधारे ताराबाईं शिंदे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. जगातील कोणत्याही धर्मांनी, त्या त्या धर्मातील पुराणांनी, धर्म ग्रंथांनी, साहित्यिकांनी, विचारवंतांनी जर आईला श्रेष्ठत्वाचा दर्जा दिला असेल, तीला देवत्व प्रदान केलं असेल तर, मग त्याच धर्मातील लोकांनी बाई ला म्हणजे स्रीयांना दुय्यम स्थान द्यायचं काय कारण?

जन्म देणारी आई ती देखील स्रीच असते ना? पुरुष फक्त गुणाची मुर्ती अणि स्री म्हणजे दुर्गुणाचीच प्रतीकृती आहे का? महिलांचे दुर्गूण चव्हाट्यावर आणले जातात मग पुरुषांचे अवगूण का झाकले जातात?असे आणि या सारखे अनेक सणसणीत प्रश्न उपस्थित करत प्रा भाग्यश्री पाटील यांनी ताराबाई शिंदे यांचा जीवनपट उभा केला.

अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील यांनी दोघं व्याख्यातांच्या विचारांवर समाजकारण आणि राजकारण यातील दोन कर्तृत्ववान महिलांना आपण योग्य तो सन्मान दिला आहे. त्यांचा यथोचित गौरव केला आहे असे समर्पक मत मांडले.

deshdoot logo
deshdoot logo

सूत्रसंचलन प्रा. वैशाली सपकाळे यांनी तर आभार प्रा. मनिषा पारधी मानले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख, उपप्राचार्य प्रा. आर. बी. देशमुख तसेच सर्व शाखेतील विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com