महिलेच्या डोक्यात कोयत्यानेे वार

चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला चौघांविरोधात गुन्हां दाखल
 महिलेच्या डोक्यात कोयत्यानेे वार

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -

तालुक्यातील वाकडी शिवारातील शेताच्या बांधावर कचरा पेटविण्याच्या वादातून (waste burning controversy) एका २८ वर्षीय महिलेच्या (woman) डोक्यात (head) कोयत्याने वार केल्याची घटना दि,७ रोजी घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस (police) स्टेशनला चौघांविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मुंदखेडा बु, येथे राहणार्‍या सुरेखा धनंजय देवरे(२८) या नेहमीप्रमाणे वाकडी शिवारातील स्वता;च्या शेतात शेती काम करण्यासाठी गेल्या असता, शेतातील बाधावर कचरा पेटविण्याच्या (waste burning controversy) कारणावरुन बबलू उत्तम धनगर, शिवा उत्तम धनगर, नितीन नाना धनगर, दिलीप रामराव पाटील रा.वाकडी यांनी दि,७ रोजी वाद घातला (Argued). तसेच शिवीगाळ करीत सुरेेखा धनंजय देवरे यांच्यासह साक्षीदारास लाढ्या-काढ्यांनी मारहाण केली.

तसेच एकाने सुरेखा यांच्या डोक्यात कोयता मारुन गंभीर दुखापत (Severe injury from machete) केली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला सुरेखा देवरे यांच्या फिर्यादीवरुन बबलू उत्तम धनगर, शिवा उत्तम धनगर, नितीन नाना धनगर, दिलीप रामराव पाटील रा.वाकडी यांच्याविरोधात गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय संदीप माने करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com