गोदाम व्यवस्थापकाने पकडली पुरवठा निरीक्षकाची कॉलर

तपासणीवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घडला प्रकार
गोदाम व्यवस्थापकाने पकडली पुरवठा निरीक्षकाची कॉलर

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (Collector's office) आवारात असलेल्या पुरवठा विभागाच्या (Supply Department) गोदामात (warehouse) साठा तपासणीसाठी (stock checking) आलेल्या पुरवठा निरीक्षकाची (Supply Inspector) गोदाम व्यवस्थापकाने (warehouse manager) कॉलर पकडून मारहाणीचा (Attempted assault) प्रयत्न केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी 4.30 ते 5 वाजेदरम्यान घडला. दरम्यान या प्रकारामुळे गोदाम परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती.

दिपावलीनिमित्त शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’ वितरीत केला जात आहे. हा शिधा आणि पुरवठा विभागाचे इतर धान्य हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील गोदामात साठा केले जाते. साठा नियंत्रणासाठी याठिकाणी गोदाम व्यवस्थापक म्हणून श्रीकांत माटे यांची नियुक्ती आहे.

गोदामातील साठ्याची वेळोवेळी पुरवठा निरीक्षकांमार्फत तपासणी केली जाते. जिल्ह्यात सुरू असलेल्या धान्य वितरणाची नेमकी आकडेवारी घेण्यासाठी शनिवारी दुपारी 4.30 ते 5 वाजेदरम्यान पुरवठा निरीक्षक पी.पी. पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील गोदामात गेले होते.

याठिकाणी उपस्थित असलेले गोदाम व्यवस्थापक श्रीकांत माटे यांच्यासमवेत त्यांची सुरूवातीला शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर गोदाम व्यवस्थापक श्रीकांत माटे यांनी हमालांच्या सहकार्याने चक्क पुरवठा निरीक्षक पी.पी. पाटील यांची कॉलरच पकडून मारहाणीचा प्रयत्न केला. मात्र याठिकाणी इतर काहिंनी मध्यस्थी करून हा वाद सोडविला.

पुरवठा अधिकार्‍यांकडून समज

दिपावली सणानिमित्त लाभार्थ्यांना धान्य वितरण आणि आनंदाचा शिधा वाटपाचे काम सुरू आहे. अशा वेळी गोदाम व्यवस्थापकाकडून पुरवठा निरीक्षकालाच बाहेर काढण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांना मिळाली. त्यांनी तातडीने गोदाम व्यवस्थापक आणि पुरवठा निरीक्षकांना बोलावून घेत समज दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com