बांभोरी गावाजवळ बर्निंग कारचा थरार

बांभोरी गावाजवळ बर्निंग कारचा थरार

वेळीच प्रकार लक्षात आल्याने कारमधील चौघे बचावले ः संपूर्ण कार खाक

जळगाव - jalgaon

बांभोरी (Bambori) गावाजवळ धावत्या कारला (Car) अचानकपणे आग (Fire) लागल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. कारमध्ये चालकासह चार जण होते. वेळीच प्रकार लक्षात आल्याने चालकाने गाडी उभी करुन चौघेही कारमधून बाहेर पडले. त्यामुळे दुर्घटना (Accident) टळली.

नशिराबाद येथील पंकज रामचंद्र महाजन हे त्यांच्या मालकीच्या एम.एच. ०२ डी.एन. ००७९ या क्रमाकांच्या कारने हिंगोणा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रविवारी दुपारी तेथून परतत असतांना बांभोरी गावाजवळ कारमधील एसी. अचानक बंद पडला. शंका आल्याने महाजन यांनी कार उभी केली. व त्यांच्यासह कारमधील इतर सर्व जण बाहेर पडले.

चौघेही बाहेर पडल्यावर काही सेंकदाच कारने पेट घेतला. काही वेळातच संपूर्ण कार आगीच्या लपेट्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यावर जैन इरिगेशन कंपनीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. तर दुसरीकडे जळगाव महापालिकेचा बंब घटनास्थळी पोहचला. जळगाव अग्निशमनचे देविदास सुरवाडे, फायरमन रोहिदास चौधरी, हिरामण बावस्कर, पन्नालाल सोनवणे यांनी पाण्याचा मारा करत आग विझविली.

या आगीत संपूर्ण कार खाक झाली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होवू नये म्हणून पाळधी पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन, उमेश भालेराव, अमोल सुर्यवंशी यांनी घटनास्थळ गाठून आगग्रस्त कार रस्त्यावरुन बाजूला केली. याप्रकरणी पाळधी पोलिसात नोंद करण्याचे काम सुरु होते.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com