दुचाकीस्वाराने वृद्धाचे साडेनऊ हजार रुपये लांबविले

 दुचाकीस्वाराने वृद्धाचे साडेनऊ हजार रुपये लांबविले

जळगाव :- jalgaon

लिफ्ट देण्याचा बहाणा (excuse to give a lift) करून दोन हजार रुपयांचे सुट्टे द्या असे सांगून एका भामट्याने (Vampire) वृद्धांचे (elderly) साडे नऊ हजार रुपये (Nine and a half thousand rupees) लांबविल्याची घटना रविवारी समोर आली आहे.

मेहरूण परिसरात राममंदिराजवळ भास्कर विठ्ठल लाडवंजारी वय ६७ हे कुटुंबासह वास्तव्यास आहे. लक्ष्मीनगरात त्यांच्या हार्डवेअरसह मोटारसायकलचे पंचर जोडण्याचे दुकान आहे. दुचाकीचे स्विच बदलण्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी भास्कर लाडवंजारी हे जयभवानी शाळेच्या बाजूला असलेल्या दीपक ऑटो या दुकानावर गेले. तेथून पुन्हा हिरो होंडा शोरुमकडे जात असताना विनानंबरच्या दुचाकीवरून एक जण आला. त्याने भास्कर लाडवंजारी यांच्याजवळ दुचाकी उभी केली व मी तुम्हाला तुमच्या आठवायच्या दुकानावर सोडतो म्हणून दुचाकीवर बसविले. काही अंतर गेल्यावर दुचाकीस्वाराने माणसांना मजुरीचे पैसे द्यायचे आहे असे सांगत गाडी दुसऱ्या दिशेने नेली. यादरम्यान एका ठिकाणी पुन्हा गाडी उभी करून दुचाकीस्वाराने लाडवंजारी यांना दोन हजार रुपयांचे सुट्टे पैसे मागितले. लाडवंजारी यांनी सुटे पैसे देण्यासाठी खिशातून ९ हजार ५०० रुपये असलेल्या शंभरच्या नोटांचे बंडल काढले असता पैसे हिसकावून दुचाकीस्वाराने पोबारा केला. लाडवंजारी यांनी आरडाओरड केला मात्र काही उपयोग झाला नाही. तब्येत बरी नसल्याने लाडवंजारी यांनी रविवारी एमआयडीसी पोलिसांना तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com