जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

22 जुलैपासून नामनिर्देशन अर्जास सुरुवात; 18 ऑगस्टला मतदान
जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

नगरपालिकांच्या निवडणुकांचा (municipal elections) आज अखेर बिगुल वाजला (trumpet sounded). राज्यातील पर्जन्यमान कमी असलेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका (Municipalities) व चार नगरपंचायतींच्या (Nagar Panchayats) निवडणुकींचा कार्यक्रम (Election program announced) राज्य निवडणूक आयोगाने आज (State Election Commission today) जाहिर केला. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार आहेत.

राज्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. या कार्यक्रमानुसार 20 जुलैपासून निवडणूकीची प्रक्रिया सुरु होणार आहे. अंतिम मतदार याद्यांची निश्चिती झालेली असून त्या मतदार याद्यानुसारच आता मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. दरम्यान सत्ताबदलानंतर नगराध्यक्ष जनतेतून निवडावा अशी भाजपची भूमिका असल्याने राज्य शासन त्या बाबत काय निर्णय घेणार या बाबतही उत्सुकता आहे. मात्र आता निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहिर केल्याने नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन पत्र भरणे (संकेतस्थळावर) 22 ते 28 जुलै स. 11 ते दु. 2

नामनिर्देशन पत्रांची छाननी व उमेदवारांची यादी प्रसिध्दी - 29 जुलै स. 11 पासून

नामनिर्देशन पत्रांची माघार - दि. 4 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत

चिन्ह वाटप व अंतीम उमेदवारांची यादी प्रसिध्दी - दि. 5 ऑगस्ट

अपीलाची मुदत - दि. 8 ऑगस्टपर्यंत

प्रत्यक्ष मतदान - दि. 18 ऑगस्ट स. 7.30 ते सायंकाळी 5.30

मतमोजणी - दि. 19 ऑगस्ट स. 10 वाजेपासून

या नगरपरिषदांची निवडणूक जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा, यावल या नगरपरिषदांची निवडणूक होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com