ग.स.च्या निवडणूकिचा बिगुल वाजला

ग.स.च्या निवडणूकिचा बिगुल वाजला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या ग.स. सहकारी सोसायटीच्या (G.S. Cooperative Society) सार्वत्रिक निवडणूकीचा(General election) कार्यक्रम गुरुवारी जाहीर (Announced) करण्यात आला आहे. दि. 18 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरवात होणार असुन दि. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने (State Cooperative Electoral Authority) पारीत केलेल्या आदेशात म्हटले आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी राज्यभरातील अ, ब, क व ड वर्गातील सहकारी बँका तसेच सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्याबाबत आदेश गुरुवारी पारीत केले आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स.सहकारी सोसायटीचाही समावेश असून ग.स. सोसायटीचाही मतदार यादी व निवडणूकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे.

सहा गट मैदानात उतरणार

ग.स.सोसायटीची रणधुमाळी जाहीर झाली असून आता सहकार गट, लोकसहकार गट,प्रगती गट, लोकमान्य गट आणि आता नव्याने उदयास आलेला शिक्षक सेनेचा महाविकास गट अशी बहुरंगी लढत होणार आहे. यापूर्वी सहकारगटाचे नेते उदय पाटील यांनी ग.स.सोसायटीची निवडणूक लवकर घेण्यात यावी,यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन देवून मागणी केली होती.

सहकार गटाने केलेल्या पाठपुराव्यामुळे ग.स.सोसायटीची रणधुमाळी आज जाहीर झाली असून 18 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. त्यामुळे मैदानात उतरण्यासाठी लोकमान्य गटासह, सहकार गट, लोकसहकार गट यांच्यात उमेदवार निवडीपासून ते निवडणुक मैदानापर्यंत सामना रंगणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन पत्र विक्री व स्वीकृती - दि. 18 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर.

छाननी - दि. 26 नोव्हेंबर

वैध नामनिर्देशन पत्र यादी प्रसिध्द करणे - दि. 29 नोव्हेंबर.

उमेदवारी अर्ज माघार- दि. 29 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर.

अंतीम उमेदवारांची यादी प्रसिध्दी - दि. 14 डिसेंबर,

प्रत्यक्ष मतदान - दि. 21 डिसेंबर

मतमोजणी - दि. 23 डिसेंबर.

पदाधिकारी निवड- दि. 31 डिसेंबर.

Related Stories

No stories found.