व्यापार्‍याने केली शेतकऱ्याची फसवणूक

व्यापार्‍याने केली शेतकऱ्याची फसवणूक

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील ओझर (Ozar) येथील एक (Farmers) शेतकर्‍याने जवळपास ४५ क्विंटल कापूस (Cotton) शहरालगत असलेल्या टाकळी प्र .चा येथील एक व्यापार्‍याला विकला, तो व्यापार्‍याने घेऊन त्याची अन्य ठिकाणी विक्रीही केली. पण शेतकर्‍याला कापसाचे पेमेंट देण्यासाठी टाळाटाळ केली. (Merchant) व्यापारी आपली फसवणूक करीत असल्याची खात्री झाल्यानंतर सदर शेतकर्‍याने अखेर शहर (police) पोलिसात धाव घेत, व्यापार्‍याविरोधात तगुन्हा दाखल केला आहे.

ओझर तालुका चाळीसगाव येथील शेतकरी कमलाकर उखा गुजर या शेतकर्‍याने टाकळी प्र. चा. येथील शिवशक्ती नगरात राहणार्‍या प्रवीण सुभाष देशमुख या व्यापार्‍याला ९६०० रुपये क्विंटल या भावाने ४४ .९४ क्विंटल कापूस विकला. या कापसाची एकूण किंमत ४ लाख ३१ हजार ४२४ रुपये होती. या कापसाचे पेमेंट प्रवीण देशमुख यांनी चेकद्वारे केले. मात्र त्याच्या खात्यावर पैसे येत नसल्याने चेक परत आले. त्यानंतर सदर शेतकर्‍याने व्यार्‍याकडे पैशाची वेळोवेळी मागणी केली. मात्र प्रवीण देशमुख उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने अखेर कमलाकर गुजर यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून प्रवीण देशमुख यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


शेतकर्‍याच्या घरात कापूस आला की तो खरेदी करण्यासाठी कापूस व्यापारी डोंबकावळ्या सारखी टपूनच बसतात. आणि शेतकरीही पणन कडून कापसाचे पेमेंट उशिरा मिळते आणि कापसाच्या बियांना पासून अन्य मशागती तर कापूस काढण्यात पर्यंतचा खर्च देण्याची ऐपत नसल्याने बहुतांश शेतकरी हे खासगी सावकारांचे उंबरठे झिजवून पैसे व्याजाने घेतात. आणि हे पैसे व्याजासह देण्यासाठी खाजगी व्यापारी कापसाचे पैसे ताबडतोब देतो म्हणून व्यापाराच्या तराजूत कापूस टाकतात. असा हा व्यवहार शेतकर्‍यांवर नाईलाजाने येतो. यात बहुतांश व्यापारी हे प्रामाणिकपणे मोजलेल्या मालाचे पैसे शेतकर्यांच्या हातात देत असले तरी शहरालगत असलेल्या ओझर गावात शेतकर्‍याने जवळपास ४५ क्विंटल कापूस टाकळी प्रचा येथील व्यापार्याला विकला तो व्यापार्याने घेऊन त्याची अन्य ठिकाणी विक्रीही केली पण शेतकर्‍याला त्याच्या कापसाचे पेमेंट देण्यासाठी टाळाटाळ केली. तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांचे या व्यापार्‍या पैसे असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com