
चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी
चाळीसगाव-औरंगाबाद महामार्गावर (Chalisgaon-Aurangabad highway) चाळीसगावकडून औरंगाबादकडे जाणार्या कंटेनरला (containers) अचानक आग (fire) लागल्याने, कंटेनरमधील जीवनाश्यक (essentials) वस्तूसह इतर वस्तू जळून खाक (Burn things) झाल्याने लाखो रुपयांचे नूकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. घटना शनिवारी दुपारी घडली असून याप्रकरणी ग्रामीण पोलीसात रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगावकडून औरंगाबादकडे जीवनाश्यक वस्तूसह इतर वस्तू घेवून जाणार्या कंटेनर(क्र.के.आर.०१, ४१६१) कन्नड घटातून जात असताना, कंटेनरने अचानक कंटनेरने पेट घेतला.
कंटेनरमधून धुर घेत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानतंर त्यांनी लागलीच कंटनेर रस्त्याच्या बाजूला उभा करुन, महामार्ग पोलिसांना त्यांची माहिती दिली. महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली व कंटनेरचा मागील दरवाजाचे लॉक तोडून कंटेनमधील सामान बाहेर काढले.
आग आटोक्यात आणण्यासाठी थोड्यावेळातच त्या ठिकाणी अग्निशमनचे तीन बंब दाखल झाले. तीन बंबाच्या सहाय्याने तब्बल सहा ते सात तासांनी आग आटोक्यात आणली. परंतू कंटेनरमधील जीवनावश्यक वस्तूसह इतर संपूर्ण सामान जळून खाक झाला. तसेच कंटेनरचे देखील मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवत हानी झाली नाही.
प्राप्त माहितीनूसार कंटेनरचेे लायनर टायरला घासले गेल्याने कंटेनरच्या टायरला आग लागली, आणि नतंर कंटेनरमधील सामानाला आग लागली. कंटनेरला आग लागल्यानतंर मोेठ्या प्रमाणात धुर निघत असल्यामुळे बघ्याची गदीं झाली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी महामार्ग पोलीसचे एपीआय. भागवत पाटील, पो सतीश पाटील, प्रताप पाटील, पोकॉ. सुनील पाटील, योगेश बेलदार, विरेंद्रसिंग सिसोदे, अमीर तडवी, दिवाकर जोशी, ईशांत तडवी, श्रीकांत गायकवाड आदि प्रचंड मेहनत घेतली. महामार्गावरील वाहतुक देखील सुरळीत ठेवली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत कुठल्याही घटनेची नोंद नव्हती.