चाईल्ड पोर्नोग्राफीचे धागेदोरे थेट धानोर्‍यापर्यंत?

सीबीआयकडून तरुणाची कसून चौकशी
चाईल्ड पोर्नोग्राफीचे धागेदोरे थेट धानोर्‍यापर्यंत?
Breaking news Breaking news

धानोरा Dhanoria ता.चोपडा ।

चाईल्ड पोर्नोग्राफी (child pornography) प्रकरणी दि.16 रोजी सीबीआय (CBI) ने देशभरातील वेगवेगळ्या तब्बल 77 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. याचेच धागेदोरे (threads) चक्क धानोरा (Dhanoria) ता.चोपडा येथ पर्यंत पोहचले असून येथील एका महाविद्यालयीन तरुणाची (college youth)घरी येऊन सीबीआयच्या एका पथकाने कसून चौकशी (Thorough inquiry) केली व त्याला पुढील चौकशी साठी हजर राहण्याबाबत नोटीस (Notice) बजावण्यात आल्याचे समजते.सदर घटनेमुळे धानोर्‍यासह जिल्ह्यात खळबळ उडाली (Excitement erupted) आहे..

चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने देशभरात 14 राज्यातील 88 आरोपींवर 23 ठिकाणी ऑनलाईन गुन्हे नोंदवून एकाच वेळी 77 ठिकाणी छापेमारी केली.यात धानोरा येथील एका प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरीही एक पथक दाखल होत महाविद्यालयीन तरूणाची चौकशी केली.यावेळी पथकाने कोणालाही घरात येऊ दिले नाही.तब्बल पाच ते सहा तास सलग चौकशी करून काय हस्तगत केले हे मात्र न कळू देता हे पथक माघारी फिरले.याबाबत कमालीची गुप्तता पाळली असली तरी या तरुणाला पुढील चौकशीसाठी नागपूरला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याचे समजते.

काय आहे चाईल्ड प्रोणोग्राफी

ऑनलाईन बाल लैंगीक शोषण आणि शोषणासंबधी आरोप असणे अर्थात माहिती व तंत्रज्ञान कायदा 67 बी होय .या कायद्यानुसार जर क़ोणी इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात कामवासना उद्दीपीत होईल अशी कृती किंवा वर्तवणुकीत लहान मुलांचा समावेश असलेले चित्रण प्रसिद्ध करेल किंवा तशी व्यवस्था करेल किंवा तशी डिजिटल प्रतीमा निर्माण करेल अशा व्यक्तींविरोधात हा गुन्हा नोंदवला जातो.

याच प्रमाणे गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी धानोरा येथील तरुणाचीही याच प्रकरणात चौकशी झाल्याने चाईल्ड प्रोणोग्राफीचे धागेदोरे येथपर्यंत ही पोहचले आहेत की काय? कारण जळगाव जिल्ह्यातील याप्रकरणी हा सीबीआयचा हा एकमेव तपास व तो ही धानोर्‍यात झाल्याने यात आणखी कोणी सहकारी सहभागी आहे का.? कोणाच्या आर्शिवादाने हे सारे सुरु आहे. अशा तर्क वितर्कांची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र या प्रकरणात येथील तरुणाचा कितपत समावेश आहे हे अंतीम चौकशीअंती लवकर स्पष्ट होणार असले तरी संबंधित प्रकरणी सीबीआयचे पथक धानोर्‍यात येवून गेल्याने खळबळ उडाली आहे हे मात्र निश्चित.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com