दुचाकीवर बसलेल्या महिलेची पोत धुमस्टाईल लांबविली

जळगाव औरंगाबाद रोडवर बाफना गो शाळेसमोर घटना
दुचाकीवर बसलेल्या महिलेची पोत धुमस्टाईल लांबविली

जळगाव jalgoan

जामनेर येथे नातेवाईकाचा बाराव्याचा कार्यक्रम आटोपून दाम्पत्य जळगावकडे परतत होते. यादरम्यान दुचाकीवर (bike) मागे बसलेल्या सरोज प्रफुल्लकुमार चोपडा (Saroj Prafullakumar Chopra) रा. रिंगरोड,जळगाव या महिलेची गळ्यातील ८० हजारांची सोन्याची चैन (Gold chain) चोरट्यांनी (thieves) धुमस्टाईल (Smoky style) लांबविल्याची घटना मंगळवारी दुपारी जळगाव औरंगाबाद रोडवर बाफना गो शाळेजवळ समोर घडली.

जळगाव शहरातील रिंगरोड परिरातील रहिवासी सरोज प्रफुल्लकुमार चोपडा वय ५६ ह्या मंगळवारी सकाळी त्यांच्या काकसासर्‍यांच्या बाराव्याच्या कार्यक्रमासाठी जामनेर येथे गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून दुपारी पतीसह दुचाकी क्रमांक एम.एच.१९ ए.आर.४१९६ ने जळगावकडे परतत होत्या.

जळगाव औरंगाबाद रोडवर बाफना गोशाळेसमोर चोपडा यांच्या मागून भरधाव वेगाने दुचाकीवरुन दोन जण आले. त्यापैकी मागे बसलेल्या एकाने सरोज चोपडा यांच्या गळ्यातील ८० हजारांची चैन धुमस्टाईल तोडून नेली. व भरधाव वेगाने पसार झाले.

याप्रकरणी सरोज चोपडा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी भेट दिली आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार करीत आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com