सुरतच्या कापड उद्योगातून ग्रामीण भागातील गृहिणींना मिळाला रोजगार

सुरतच्या कापड उद्योगातून ग्रामीण भागातील गृहिणींना मिळाला रोजगार

राजेश निकम

फेकरी, Fekri ता.भुसावळ ।

जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गृहिणींना (housewives) सुरतच्या (Surat) कापड उद्योग व्यापारामुळे (Textile industry) घराघरात रोजगार (Employment) उपलब्ध झाला आहे. महामारी कोरोना (Corona) काळात बाहेरगावी कंपनीत कामाला गेलेल्या लोकांना कामावरून कमी केल्यामुळे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची (Famine on the family) वेळ आली होती आणि कामासाठी वनवन फिरावे लागत होते, परंतु सुरतच्या कापड उद्योग व्यापारामुळे खेडोपाडी, गल्लोगल्ली घरातील प्रत्येकाला लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत घरबसल्या रोजगार (Employment) उपलब्ध झाला असून सर्वांना रोजगाराचा पर्याय खुला झाला आहे.

सुरतमधून काही तरुण साडी, ड्रेस (Saree, dress), लांच्या अशा प्रकारचे कच्चे मटेरियल ठरावीक ठरलेल्या ठिकाणी पाठवून नंतर ग्रामीण भागातील घरोघरी पाठवून त्या कच्च्या मालावर टिकल्या लावून सुंदर डिझाईनींग (Beautiful design with tiklas) केली जाते व दिलेल्या वेळेवर काम पूर्ण केल्यास त्या मोबदल्यात मानधन दिले जाते. या आधी व्यापार्‍यांना कंपनीत कामगार ठेवल्यावर त्याचे राहणे, जेवण व इतर खर्च करावा लागत असे, परंतु हा माल ग्रामीण भागात टप्प्या टप्प्यात वाटून दिल्याने वरील खर्च वगळता व्यापार्‍यांची आर्थिक बचत (Financial savings of traders) होत असून गृहिणी घरातील सर्व कामे करून दुपारच्या वेळी दिलेल्या कापड मालावर टिकल्या लावून सुंदर डिझाईनिंग करतात व लहान मुलांना बिस्कीट, चॉकलेटसाठी काही पैसे मिळतील म्हणून घरातील लहान बालके सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा फायदा घेत त्यांना मदत करतात. दुपारच्या वेळी लहान मुलं घरात मदत करत असल्यामुळे त्यांचे उन्हापासून संरक्षण होत आहे.

हे काम घरातल्या घरात करायचे असल्यामुळे घरातील प्रत्येक जण न लाजता आनंदाने करत असून चांगल्या घरातील गृहिणी ज्यांना कामाची आवश्यकता नाही, अशा सुद्धा यात रस दाखवत आहे. या घरबसल्या रोजगारामुळे गृहिणींना घरखर्चासाठी आधार (Basis for house expenses) झाला असून आपल्याला दिलेल्या वेळेत काम पूर्ण करायचे असल्यामुळे गृहिणी घरातील कामे होताच कच्च्या कापड मालावर टिकल्या लावण्याच्या कामाला लागत असल्याने त्यांना शेजारच्यांशी गप्पागोष्टी किंवा कोणाची चुगली करण्याचा वेळ नसतो.

यामुळे परिसरात शांततेचे वातावरण आहे. हा उद्योग फक्त गुजरात सारख्या व्यापारी शहरात होता पण आता तो जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागात पोहोचल्याने शेतकामासाठी जाणार्‍या शेतमजूर महिला यांचा उन्हापासून संरक्षण झाले असून महिला, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे. असेच दुसर्‍या नामांकित कंपन्यांनी व उद्योजकांनी ट्रायल बेस वरती घरबसल्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार (Educated unemployed) व महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा असे परिसरातून बोलले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com