वाढीव वसाहतीत लागू केलेली कर मागणी अन्यायकारक!

नव्याने सर्व्हे करा ; छावा संघटनेचे अध्यक्ष सुनील महाजन
वाढीव वसाहतीत लागू केलेली कर मागणी अन्यायकारक!

रावेर|प्रतिनिधी raver

पालिकेच्या हद्दीत सामील झालेल्या नवीन वसाहतीकडून (New colony) पालिकेने (municipal council) अन्यायकारक कर वसुली सुरू केली आहे. अद्याप कुठल्याही सुविधा दिल्या नाहीत,पण कर मागणी आग्रहीपणे होत आहे. पालिकेने तूर्तास कर मागणी थांबवून या भागातील अडचणी दूर कराव्यात तसेच पाठवलेली कर मागणी नोटीस निकषानुसार नसल्याने, पुन्हा पालिकेच्या कर्मचार्याकडून सर्व्हे करून सुधारित कर लावावेत आधी विकास, मग कर मागणी अशी मागणी असलेले निवेदन दि.२७ गुरुवारी छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील महाजन यांच्या नेतृत्वाखालील देण्यात आले.

सदरील निवेदन पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक तडवी यांनी स्वीकारले याप्रसंगी साईबाबा मंदिराचे माजी उपाध्यक्ष राजेश महाजन,साईबाबा मंदिर समितीचे अध्यक्ष चंद्रकांत विचवे,जेष्ठ सदस्य जे.एस.पाटील,सुनील सुरेश महाजन,अरुण चौधरी,मिलिंद पाटील,मोहन फिरके,तुषार महाजन,प्रफुल्ल महाजन,लखन शहा, मनोज मराठे,आदर्श गणवानी,रोहित महाजन,श्रीकांत जगताप,शुभम मराठे, राहुल महाजन,गोकुळ पाटील,गोविंद मराठे,दीपक जाधव, राजेश महाजन,योगेश महाजन,महेश चौधरी,सुनील महाजन, रघुनाथ मस्कावदे यांच्यासह अष्टविनायक नगर, श्रीकृष्ण कॉलनी, तडवी कॉलनी व वाढीव वसाहतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com