एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्तींच्या संघटनेची ताकत मोठी असते : प्रा.डॉ.नितीन बारी.

एकाच ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्तींच्या संघटनेची ताकत मोठी असते : प्रा.डॉ.नितीन बारी.

जळगाव jalgaon (प्रतिनिधी)

अखिल भारतीय शैक्षिक महासंघ (All India Educational Federation) संलग्नित नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ॲण्ड कॉलेज टीचर्स असोसियशन (North Maharashtra University and College Teachers Association) अर्थात एन.मुक्ता या क.ब.चौ.उ.म.वि.परिक्षेत्रात प्राध्यापकांसाठी कार्य करणाऱ्या सशक्त संघटनेच्या जळगाव येथे स्थापित करण्यात आलेल्या केंद्रीय कार्यालयाचे (Central Office) आणि कार्यालय फलकाचे उद्घाटन (Inauguration) राम नवमीच्या शुभ मुहूर्तावर आमदार गिरीश महाजन (MLA Girish Mahajan), आमदार राजूमामा भोळे (MLA Rajumama Bhole) यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन समिती सदस्य (Management Committee Member) दिलीप दादा पाटील (Dilip Dada Patil), व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एल. पी. देशमुख, केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन बारी, एन. मुक्ता संघटनेचे महासचिव डॉ. अविनाश बडगुजर, जळगाव जिल्हा सचिव डॉ.अजय पाटील आणि अन्य पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाप्रसंगी संघटनेचे संघटन गीत (Organization song) प्रताप कॉलेजचे डॉ. धनंजय पाटील यांनी सादर केले. त्यानंतर एन. मुक्ता संघटनेचे महासचिव डॉ.अविनाश बडगुजर (General Secretary Dr. Avinash Badgujar) यांनी प्रास्ताविकात सांगितले की अखिल भारतीय शैक्षिक महासंघ, नवी दिल्ली या शिक्षक (Teacher) संघटनच्या संपूर्ण भारतामध्ये ४९९ शाखा आहेत व एकूण सात लाखा पेक्षा जास्त सदस्य असलेली एकमेव संघटना आहे या संघटनेमध्ये केजी टू पीजी वर्गातील शिक्षकांच्या समस्या (Teacher problems) सोडविण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक काम (Positive work) करण्यात येते. या संघटनेतील शिक्षकांच्या माध्यमातून समाज कार्य, शैक्षणिक कार्य आणि सांस्कृतिक कार्य केले जाते. संघटनेतर्फे प्रत्येक वर्षी अनेक विधायक कार्यक्रम होत असतात त्यामध्ये स्वामी विवेकानंद जयंती व सुभाष चंद्र जयंती दरम्यान म्हणजे कर्तव्य बोध सप्ताह साजरा केला जातो. तसेच गुरूंना वंदन करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु वंदना (Guru Vandana) कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. तसेच भरीव आणि विधायक योगादान देणाऱ्या शिक्षकांचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान देखील करण्यात येत असतो.

केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर नितीन बारी (Central President Dr. Nitin Bari) यांनी त्यांनी सांगितले की एन.मुक्ता ही प्राध्यापक संघटना विधायक मार्गाने आणि नीतीमूल्यांना महत्व (importance of ethics) देवून कार्य करणारी संघटना आहे. एकाच ध्येयाने (goal) प्रेरित झालेल्या व्यक्तींच्या संघटनेची (organization) ताकत मोठी असते. आपल्या संघटनेत खऱ्या अर्थाने एकाच ध्येयाला समर्पित सदस्य कार्यकर्ते आहेत, ही संघटनेची जमेची बाजू आहे. क.ब.चौ.उ.म.वि.परिक्षेत्रातील प्राध्यापकांच्या विविध समस्या (Teacher problems) निवारणासाठी, भविष्यात होणाऱ्या विविध प्राधिकरणाच्या निवडणुकीच्या कार्यासाठी आणि विद्यापीठात कामानिमित्त आलेल्या धडगाव-तळोदा सारख्या लांबच्या ठिकाणावरील सदस्याला थांबण्यास मदत होईल, या हेतूने सदर कार्यालय जळगाव येथे उघडण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप दादा पाटील (Dilip Dada Patil) यांनी कार्य, कार्यकर्ता, कार्यालय, कार्यक्रम आणि कार्यकारणी (Executive) याचे महत्व आपल्या मनोगतामधून विशद केले. संघटना बांधणी (Organization building) करतांना ज्या गुणांची गरज असते, तसेच संघटनेचे कार्य कसे असावे यावर त्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या संघटनेच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या ध्येय धोरणांची आखणी करतांना त्यात सर्व बाजूनी विचार करावा, त्यात निर्माण होणाऱ्या अडचणींचा अंदाज देखील घ्यावा, चर्चा-विचार विनिमय आणि एकमताने निर्णय (Unanimous decision) घेवून आपल्या कार्याला गती द्यावी असे विचार सुद्धा दिलीप रामू पाटील यांनी मांडलेत. व्यासपीठावर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एल. पी. देशमुख आणि डॉ.जे.बी.नाईक, अधिसभा सदस्य श्रीमती मनीषा चौधरी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला माजी कुलसचिव प्रा.डॉ.ए.एम.महाजन, प्रभारी परीक्षा नियंत्रक प्रो.दीपक दलाल, विद्यापीठातील व्यवस्थापन प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.ए.पी.डोंगरे, वाणिज्य अध्ययन मंडळ अध्यक्षा डॉ.कल्पना नंदनवार, संघटनेचे कायदे विषयक सल्लागार अॅड प्रवीण जी पुर्भे, भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.व्ही.जे.पाटील, फिजिक्स अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.डी.एस.पाटील, समाज कार्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.विनोद रायपुरे, रा.से.यो.चे माजी संचालक डॉ.पंकज नन्नवर, धडगाव कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ.एच.एम.पाटील, दहिवेल कॉलेज चे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश अहिरे, डॉ.नितीन बडगुजर, प्रा.विजय लोहार, डॉ.बी.जी.देशमुख, चंद्रशेखर वाणी,डॉ.मनोज चोपडा, डॉ.भूषण कवीमंडन, डॉ.पावन पाटील, डॉ.अमरदीप पाटील, डॉ.अंशुमन मिश्रा, डॉ.राजेश भामरे, डॉ.दिनेश महाजन, डॉ.अनिल बारी असे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन रायसोनी महाविद्यालयाचे डॉ.राजकुमार कांकरिया यांनी तर आभार बोदवड कॉलेजचे डॉ.अजय पाटील यांनी केले. याशिवाय सोहळ्याला संघटनेमधील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून विविध महाविद्यालयाचे १८० सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com