केळी पट्ट्यात वादळाचा तडाखा

रावेर तालुक्यातील चिनावलसह इतरत्र बसला फटका
केळी पट्ट्यात वादळाचा तडाखा
वादळाने पाडळा येथील जमीनदोस्त झालेली केळी बाग

रावेर Raver|प्रतिनिधी-

मंगळवारी दुपारी पाऊसासह वादळाने (Storms with rain) रावेर तालुक्यात हजेरी लावत,शेकडो हेक्टरवरील केळी बागाना भुईसपाट (Banana orchards flat) केले आहे.

चिनावल येथील शेतकरी चेतन चौधरी यांचे केळी बागेचे झालेले नुकसान
चिनावल येथील शेतकरी चेतन चौधरी यांचे केळी बागेचे झालेले नुकसान

तालुक्यातील चिनावल,कुंभारखेडा,सावखेडे, गौरखेडा,लोहारा,अहिरवाडी,निरुळ,पाडळा या भागात मोठ्या प्रमाणात वादळाचा तडाखा (blow of the storm) बसला आहे.ऐन कापणीवर आलेली शेकडो हेक्टरवरील केळी या वादळाने जमीनदोस्त (Banana orchards flat) झाली आहे.तर अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे (trees) उन्मळून पडल्याने रहदारी ठप्प (Traffic jams) झाली आहे.कुंभरखेडा येथील माध्यमिक विद्यालयातील किचनवरील पत्री वादळाने उडून गेली,तर गौरखेडा येथे देखील अनेक घरांवरील पत्रे उडाली आहे.

हिंगोणा येथे वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस

हिंगोणा येथे वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला साडेचार वाजेच्या सुमारास सुरुवात झाली यात ग्रामपंचायत परिसरातील झाड तसेच गावात काही ठिकाणी झाडे कोसळली यात काही घरांचे किरकोळ नुकसान झाले वादळी वाऱ्याने अनेक लोकांच्या घरावरील पत्रे सुद्धा उडाली वाऱ्यामुळे वीज पुरवठा (Power supply) देखील काही तास खंडित झाला होता .यात शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे सुद्धा नुकसान झाल्याचे वर्तविण्यात येत आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com