ताराबाई मोडक, कमला भसीन आणि पंडीता रमाबाईचे सामाजिक योगदान क्रांतीकारीच

कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथेत प्रा. भाग्यश्री होले, प्रा सोनाली राजकुंडल आणि प्रा मनिषा पारधी यांचे प्रतिपादन
ताराबाई मोडक, कमला भसीन आणि पंडीता रमाबाईचे  सामाजिक योगदान क्रांतीकारीच

जळगाव jalgaon

भारतीय इतिहासात (Indian history) ताराबाई मोडक,(Tarabai Modak) कमला भसीन (Kamala Bhasin) आणि पंडीता रमाबाई (Pandita Ramabai) यांचे सामाजिक योगदान (Social contribution) क्रांतीकारी (Revolutionary) होते. समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी घेतलेले परिश्रम अजरामर राहतील असा सुर नूतन मराठा महाविद्यालयच्या (Nutan Maratha college ) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने (Golden jubilee year) आयोजित कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा (Success stories of capable women) सांगणार्‍या आजच्या व्याख्यानमालेतून (Lecture series) निघाला.

Nutan Martha college logo
Nutan Martha college logo

नूतन मराठा महाविद्यालय आयोजित कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणार्‍या व्याख्यानमालेचा आज सहावा दिवस. आजची व्याख्यानामाला तीन सत्रात झाली. यात प्रा. भाग्यश्री होले, (Prof. Bhagyashree Hole) प्रा. सोनाली राजकुंडल ( Prof. Sonali Rajkundal) आणि प्रा. मनिषा पारधी ( Prof. Manisha Pardhi) यांनी भारतीय इतिहासातील थोर कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा परिचय करून दिला.

प्रारंभी प्रा. पल्लवी शिंपी यांनी जिजाऊ वंदना सादर केली. पहिल्या सत्राचे अध्यक्ष डॉ. साहेब पडलवार होते. वक्त्या प्रा. भाग्यश्री होले यांनी ताराबाई मोडक यांच्या जीवन परिचयासोबतच त्यांच्या सामाजिक , शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याचा विस्ताराने परिचय करून दिला. विधवा आणि परित्यक्त्या महिलांसाठी केलेली शारदा सदनची निर्मिती, अंगणवाडी आणि बालवाडींचा विकास, आदिवासी मुलांच्या शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी केलेली कुरण शाळेची निर्मिती, शिक्षणाला प्रारंभ करण्याचं योग्य वय म्हणजे अडीच ते वय वर्षे पाच असावे असा दुरदृष्टीकोन, बालपणापासूनच विचारात असलेली परिपक्वता आणि बंडखोरी अशा अनेक पैलूंवर प्रकाश टाकून प्रा होले यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाचा समारोप केला.

अध्यक्षीय भाषणात डॉ. साहेब पडलवार यांनी ताराबाई मोडक यांच्या कुरण शाळेच्या कल्पनेतूनच अलिकडे विलासराव देशमुख यांनी कुरणशाळांना परवानगी दिल्याचा उल्लेख केला आणि कुरणशाळेत वन्य उत्पादन अथवा वन्य साधन सामुग्री च्या आधारे प्राप्त परिस्थितीत कसं शिकवलं जायचं याबाबत माहिती दिली. उदाहरणार्थ लाल रंग शिकवायचा असेल तर पिकलेलं बोर अन् हिरवा रंग शिकवायचा असेल तर कच्च बोर दाखवून तसेच चार आवळयातून दोन आवळे खाल्ले तर किती उरले याप्रमाणे रंग संगती अन् अंक गणिताचे शिक्षण देण्याची ताराबाई मोडक यांच्या अभिनव उपक्रमाची माहिती दिली. त्या काळात त्यांनी केलेला प्रेम विवाह यातून त्यांचा व्यवस्थेच्या विरोधात धारीष्टय दाखवून उभं राहण्याच्या धाडसी गुणाचा परिचय करुन देत अध्यक्षीय समारोप केला.

दुसर्‍या सत्रातील प्रमुख वक्त्या प्रा. सोनाली राजकुंडल यांनी स्त्रीवादी लेखिका कमला भसीन यांचा जीवनप्रवास उलगडून त्यांची शिक्षणाचं महत्त्व सांगणारी मुझे पढना है ही कविता ऐकवली. मुलींना हुंडा नको तर संपत्तीचा अधिकार मिळाला पाहिजे, सगळ्याच क्षेत्रात स्त्रीयांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, पुरुषसत्ताक पद्धतीला जसा त्यांचा विरोध होता तितकाच स्री सत्ताक पद्धतीला देखील होता, जर निसर्गाने स्री आणि पुरुष निर्माण केला असेल तर कोण उच्च आणि कोण कनिष्ठ असा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगून कमला भसीन यांच्या स्त्रीवादी जाणिवांचा परिचय करून दिला.

या सत्राला डॉ. अविनाश बडगुजर अध्यक्ष होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात कमला भसीन यांनी नूसता व्यव्हारातील पुरूषी अहंकाराचाच विरोध केला नाही तर भाषेतील पुरुषी अहंकाराला देखील त्यांनी छेद देत स्वभाषा निर्माण करणारी आशिया खंडातील पहिली स्रीवादी सुधारक म्हणून नावलौकिक मिळवला असे सांगत कमला भसीन ह्या तत्कालीन महिला सबलीकरण चळवळीचा बुलंद आवाज होत्या, खर्‍या बंडखोर स्त्रीवादी लेखिका होत्या असं सांगत आपल्या अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषणाचा समारोप केला.

तिसर्‍या सत्रातील प्रमुख वक्त्या प्रा. मनिषा पारधी यांनी थोर स्री सुधारक पंडीता रमाबाई यांचा परिचय करून दिला. ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या रमाबाई यांनी अंधश्रद्धा आणि बुरसटलेल्या विचारांनी बरबटलेल्या काळात वयाच्या बाविसाव्या वर्षी लग्न करुन एकाच वेळी दोन अनिष्ठ रुढींना छेद दिला.

मुलीचे लग्न बाल वयातच आणि जातीतल्या पुरुषाशीच झालं पाहिजे अशी धारणा असलेल्या काळात त्यांनी उचललेलं पाऊल त्यांच्यातील बंडखोर वृत्तीला अधोरेखित करतं. शारदा सदन च्या माध्यमातून विधवा महिलांसाठी गृह उद्योग तसेच शैक्षणिक धडे गिरवायला लावणार्‍या रमाबाईंना त्यांच्या या अलौकिक कार्यासाठीच पंडीता ही पदवी देण्यात आली. त्यांनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज आणि रमाबाई असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून स्त्रीयांना प्रवाहात आणण्यासाठी जे अथक प्रयत्न केलेत ते खरोखरच पिढ्यानपिढ्यासाठी मार्गदर्शक ठरणारं असल्याचे सांगितले.

deshdoot logo
deshdoot logo

या सत्रातील अध्यक्ष डॉ. जे. पी. सोनटक्के यांनी पंडीता रमाबाई यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन त्यांच्यातील साहित्यिक गुणांना देखील उजाळा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.

प्रा स्वाती राजकुंडल यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. भाग्यश्री पाटील यांनी आभार मानले.

यावेळी प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य डॉ. एन. जे. पाटील, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख, उपप्राचार्य प्रा. आर. बी देशमुख, कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ इंदिरा पाटील, सर्व शाखेतील विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com