नंदुरबार सराफ ज्वेलर्सचे दुकान फोडून अडीच लाखांचे दागिने लंपास

तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद
नंदुरबार सराफ ज्वेलर्सचे दुकान फोडून अडीच लाखांचे दागिने लंपास

जळगाव - jalgaon

शहरातील ढाकेवाडी येथील नंदुरबार सराफ ज्वेलर्सचे (Nandurbar Saraf Jewelers) दुकान फोडून दुकानातून सुमारे २ लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे व चांदीचे दागिणे चोरट्यांनी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समोर आली आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून तीन चोरटे कटरने दुकानाचे कुलूप तोडून गोणीतून सोन्या चांदीचे दागिणे लांबवून नेतांना दिसून येत आहेत. जळगाव शहरातील ढाकेवाडी येथे प्रसन्न प्रदीप सराफ हे कुटुंबियांसह तीनमजली इमारतीत राहतात. याच इमारतीत नंदूरबारकर सराफ नावाचे सराफ यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. प्रसन्न यांनी शनिवारी नेहमीप्रमाणे रात्री १० वाजता दुकान बंद केले होते.

रविवारी सकाळी साडेसात वाजता उठल्यानंतर प्रसन्न सराफ घराच्या बाहेर आले असता, त्यांना दुकानाचा दरवाजा उघडा दिसला. दुकानात जावून पाहिले असता दुकानात सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. दुकानात पाहणी केली केल्यावर चोरी खात्री झाल्यावर प्रसन्न यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. चोरट्यांनी दुकानातुन २ लाख ४० हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिणे लांबविले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यावर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसे तज्ञ आणि श्‍वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी प्रसन्न प्रदीप सराफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुपारी ३ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१८ मिनिटे चोरटे दुकानात

दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात (CCTV cameras) चोरीचा प्रकार कैद झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फुटेजनुसार रविवारी पहाटे ३ वाजून ३२ मिनिटांनी डोक्यावर टोपी, हातमोजे आणि तोंडाला रूमाल बांधलेले तीन चोरटे आले. त्यांनी कटरने दुकानाचे दोन्ही कुलूप तोडले. त्यानंतर दोन जणांनी आत प्रवेश केला. तर एकजण बाहेर थांबलेला होता. ३ वाजून ४८ मिनिटांनी दुकानाच्या आत गेलेले दोन्ही चोरटे एका गोणीत सोने चांदीचे दागिणे भरून बाहेर पडले.

Related Stories

No stories found.