बहिणाबाई महोत्सवाचे सातवे पर्व रंगणार

18 ते 24 एप्रिलदरम्यान सात दिवस लोककलेचा जागर
बहिणाबाई महोत्सवाचे सातवे पर्व रंगणार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

खान्देशाचा सांस्कृतिक चळवळीला बळ देणारा बचत गटाच्या (self-help group) महिलांना (women) आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरलेला बहिणाबाई महोत्सव 2022 (Bahinabai Mahotsav) या सातव्या वर्षाचे आयोजन दि 18 ते 24 एप्रिल रोजी बॅरिस्टर निकम चौक सागर पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला (Folk art) यांच्या सादरीकरणासह देश भक्तीचा जागर (Awakening of patriotism) विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सात दिवस चालणार आहे.

कोरोना महामारीच्या प्रलयामुळे मागील वर्षीचा महोत्सव कोरोना निर्बंधांमुळे (Corona restrictions) रद्द करण्यात आला होता. एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या महोत्सवाचे आयोजन होत असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Amrut Mahotsavi of Indian Independence) वर्षाचे औचित्य साधून या वर्षीचा महोत्सव सात दिवस राहणार आहे. महिला बचत गटाने (Women's self-help groups) निर्माण केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ निर्माण व्हावी त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंना योग्य ती किंमत मिळावी व त्यातून महिलांचा आर्थिक उन्नती (Economic prosperity) व विकास व्हावा हा मूळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून भरारी फाउंडेशनच्या(Bharari Foundation) वतीने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

बचत गटांची नोंदणी

यावर्षीच्या महोत्सवाचे 7 वे वर्ष असून हा महोत्सव दि.18 एप्रिल ते 24 एप्रिलदरम्यान सात दिवस होणार आहे. महोत्सवाच्या आयोजनाची तयारीला प्रारंभ झाला असून महिला बचत गटांचा उस्फूर्त प्रतिसाद (Spontaneous response) मिळत आहे. महिला बचत गटांना या महोत्सवात त्यांनी तयार केलेल्या मालाच्या विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करण्यात येत असून दि. 10 एप्रिलपर्यंत हे बुकिंग सुरू असणार आहे. सागरपार्क मैदानावर महिला बचत गटांसाठी स्टॉल (Stall) उभारण्यात येणार आहे. महिला बचत गटांनी नोंदणी करुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी, विनोद ढगे, सचिन महाजन यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com