
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा (Scholarship Examination) जिल्ह्यातील 163 केंद्रांवर होणार आहे. यामध्ये इयत्ता पाचवीचे 12 हजार 258 तर आठवीचे 9 हजार 858 विद्यार्थी परीक्षेस पात्र (Students eligible for exam) आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पाचवी व आठवीसाठी 20 जुलै रोजी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर शिष्यवृत्तीची परिक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्याने या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता ही परीक्षा दि.31 जुलै रोजी होणार आहे.
राज्य परिक्षा परिषद पुणेच्या वतीने राज्यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी करिता घेण्यात येणारी शिष्यवृत्तीची परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात आली होती. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश स्थिती व विद्यार्थ्यांना दळणवळणास येणार्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता या परीक्षा 31 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
इयत्ता पाचवीसाठी जिल्ह्यात 92 केंद्रे निर्धारित करण्यात आले. तसेच आठवीसाठी 71 केंद्र निश्चित करण्यात आले आहे. असे एकूण जिल्ह्यातील 163 केंद्रावर परीक्षा होणार आहे. प्रत्येक केंद्रावर पर्यवेक्षक नेमण्यात आले आहे. जिल्हास्तरावर 2 तर प्रत्येक तालुक्यात एक एक भरारी पथक नेमण्यात आले आहे. अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव यांनी दिली.