वाळू माफियाने काढली तलाठ्यांच्या दुचाकीची चावी

चालकासह मालकाची मुजोरी; तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वाळू माफियाने काढली तलाठ्यांच्या दुचाकीची चावी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

नदीपात्रातून (river basin) वाळूची चोरटी वाहतुक (Stealth transport of sand) करतांना तलाठ्यांच्या पथकाने (team of Talathis)ट्रॅक्टरवर कारवाई (Action on tractors) केली. दरम्यान, हे ट्रॅक्टर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector's Office) घेवून जात असतांना ट्रॅक्टर मालकाने (tractor owner) तलाठ्यांच्या दुचाकीची (Talathi's bike) चावी काढून (Remove the key) त्यांना विरोध केला. तसेच तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत ट्रॅक्टर पळवून घेवून गेल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Station) ट्रॅक्टर मालकासह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू माफियाने काढली तलाठ्यांच्या दुचाकीची चावी
PHOTOS # जखम डोक्याला, मलमपट्टी पायाला..!

धरणगाव येथील तलाठी रवींद्र श्रीरंग घुले हे अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी तयार केलेल्या भरारी पथकात असून ते दि. 4 रोजी राजू कडून बार्‍हे, सहाय्यक तलाठी माधूरी गणेश साळुंखे यांच्यासोबत खासगी कारने तर रविंद्र घुगे हे आपल्या दुचाकीने कारवाईसाठी गेले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सावखेडा शिवारातून वाळूची वाहतुक करणारे विनाक्रमाकांचे ट्रॅक्टर त्यांना दिसले.

त्यांनी ट्रॅक्टर चालकाला थांबवित त्याच्याकडे वाहनाचे कागदपत्रांसह वाळू वाहतुकीच्या परवान्याची विचारणा केली. त्यावेळी चालकाने त्याचे नाव नितीन किसन कुंभार रा. मयूर कॉलनी व मालकाचे नाव फैजल खान अस्लम खान पठाण रा. पिंप्राळा असे सांगितले. तसेच आपल्याकडे वाळु वाहतुकीचा परवाना नसल्याचे देखील त्याने पथकाला सांगितले.

तलाठ्याच्या दुचाकीची चाबी काढून आणला अडथळा

ट्रॅक्टरवर कारवाई होत असल्याची माहिती चालकाने मालकाला दिल्यानंतर मालक फैजल खान हा त्याठिकाणी आला. त्याने आप्पा मी ट्रॅक्टर बाजूला घेतो असे म्हणत तो पळून जात असल्याची शंका तलाठी यांना होती. तसेच पथक आपला पाठलाग करेल या भितीने फैजल खान याने तलाठ्यांच्या मोटारसायलकची चाबी काढून घेत त्यांच्या कारवाई करीत असतांना अटकाव केला.

वाळू माफियाने काढली तलाठ्यांच्या दुचाकीची चावी
महिलेचा विनयभंग केल्यानंतर तरुणाचे विष प्राशन

मालकासह चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कारवईसाठी गेलेल्या पथकाने ट्रॅक्टर चालकाला काही अंतरापर्यंत पाठलाग केला. परंतु ट्रॅक्टर चालक पळून गेल्याने तलाठ्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. दम्यान, त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार ट्रॅक्टर मालक फैजल खान अस्लम खान पठाण, चालक नितीन किसन कुंभार रा. पिंप्राळा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू माफियाने काढली तलाठ्यांच्या दुचाकीची चावी
फैजपूर येथे आज स्वयंभू पांडुरंगाचा रथोत्सव 

मालकाने सांगताच चालक ट्रॅक्टर घेवून पसार

ट्रॅक्टर चालकाचा जबाब नोंदविल्यानंतर वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून तलठ्यांचे पथक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाले. दरम्यान, सावखेडा बु. येथून पिंप्राळ्याकडे जात असतांना मालक फैजल हा वाहनापुढे चालत होता. तर तलाठी बार्‍हे व माधूरी साळुंखे या वाहनाच्या मागे चालत होते. परंतु पिंप्राळ्यातील कुंभार वाड्याजवळ वाहन पोहचताच येथे ट्रॅफिक जाम होती. हीच संधी साधत ट्रॅक्टर मालक फैजल याने चालकाला ट्रॅक्टर घेवून जाण्यास सांगितले. त्यानुसार चालक हा ट्रॅक्टर भरधाव वेगाने पळवून तो गल्लीबोळातून निघून गेला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com