वाळू माफियाकडून मंडळाधिकार्‍याला धक्काबुक्की

रस्त्यावर वाळू उतरवून डंपरचालक पसार
वाळू माफियाकडून मंडळाधिकार्‍याला धक्काबुक्की

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

अवैध वाळूची वाहतुक (Illegal sand transport) करणारे डंपर पकडल्यानंतर चालकाला वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून जाण्यास सागितले. परंतु डंपरचालकाने (dumper driver)मंडळाधिकार्‍याला (Mandal Dhikari) डंपरमध्ये बसवून थोड्या अंतरावपर्यंत घेवून जात धक्काबुक्की (push) करीत वाहनातून उतविले. डंपरमधील वाळू रस्त्यावर फेकून पळून गेल्याची घटना जूना खेडीरोड परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी डंपरचालकाविरुद्ध शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील म्हसावद भाग मंडळाधिकारी अजिंक्य उद्धव आंधळे हे नोकरी करीत आहे. शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते उपविभागीय अधिकारी महेश सुधळकर, वाहन चालक सुरेश महाजन हे शाासकीय वाहन (एमएच 19 सीवाय 9991) क्रमांकाच्या वाहनातून अवैध वाळू उत्खन्नाला रोखण्यासाठी काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या मागील बाजूला असलेल्या खेडी रोडवरील श्री कॉलनीजवळील टी पॉईंटवर गस्तीवर होते.

यावेळी जळगावकडून खेडी रोडकडे (एमएच 04 जीऐ 2615) क्रमांकाचे डंपर अवैध वाळू वाहतुक करतांना दिसले. त्या डंपरचालकाला पथकाने थांबविले आणि विचारपूस केली. त्यावर डंपचालकाने डंपरमालाकचे नाव आकाश ईच्छाराम पाटील रा. जूना असोदा रोड असे सागितले. पथकाने वाहनचालकाला परवानाबाबत विचारणा केली असता, त्याने वाळूचा परवाना नसल्याचे सांगितले. दरम्यान, मंडळाधिकारी अजिंक्य आंधळे हे डंपरच्या कॅबिनमध्ये बसवून डंपर जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून जाण्यास सांगितले.

वाळू रस्त्यावर फेकून पळून डंपर घेवून पसार

डंपरचालकाने डंपर जिल्हाधिकारी कर्यालयात न घेवून जाता तो वाहन मागे वळवितो असे सांगून डंपर डीएनसी कॉलेजच्या रोडने भरधाव वेगाने घेवून गेला. त्यानंतर चालकाने मंडळाधिकार्‍याला धक्काबुक्की करीत वाहनातून उतरवून दिले आणि त्यानंतर डंपरमधील वाळू रस्त्यावर खाली करुन तो डंपर घेवून पळून गेला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com