पुर्वजांच्या जीवीत समाधींचे पावित्र्य धोक्यात

वरणगाव न.पा.चे दुर्लक्ष
पुर्वजांच्या जीवीत समाधींचे पावित्र्य धोक्यात

वरणगाव, Varangaon ता.भुसावळ । वार्ताहर

सर्वत्र जमिनींचे भाव गगनाला भिडलेले असताना वरणगाव शहरातील कोट्यवधींची गायरान जमिनीला (Guyran to the ground) संस्था चालकांच्या व तत्कालीन ग्रामपंचायतपासुन सद्या नगरपरिषद प्रशासनाच्या (Municipal administration) आशीर्वादामुळे अतिक्रमणांचा विळखा (Get rid of encroachments) पडला असुन येथील गायरान संस्था चालकांतील पुर्वजांच्या अग्रवाल कुटूंबातील (Agarwal family of ancestors) दोन जीवीत समाधी (Samadhi of two living beings) आहे. या समाधींची सुरक्षा देखील अतीक्रमणात अडकल्या आहेत. त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सद्या तरी नगरपरीषदेची आहे, मात्र नगरपरीषदेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून स्थानिक नागरीकांनी या जमिनीचा अतिक्रमण करून बेकायदा वापर (Illegal use) सुरू केला असल्याचे चित्र आहे.

वरणगाव शहरातील बसस्थानक परीसरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी गायरान संस्था चालकांच्या अग्रवाल कुटूंबातील भाविक पती-पत्नी पुर्वजांच्या दोन जिवीत समाधी असुन त्यांचे पावित्र आतिक्रमणामूळे धोक्यात आले आहे. सुरुवातीच्या तत्कालीन ग्रामपंचायत कार्यकाळापासुन वरणगाव शहरात भुसावळ येथील काही भाविक अग्रवाल कुटूंबातील पुर्वजांनी गोसंरक्षण संस्थेची निर्मिती केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून शासनाने गोवंशाला चारा, पाणी करता यावा या दृष्टीकोनातून गायरान म्हणुन नागेश्वर महादेव मंदिर टेकडी ते भोगावती नदी पात्रापर्यंत जामिन बहाल केली आहे. मात्र संस्था चालकांतील कोणी हयात नसावे त्या दृष्टिने वारसदारांचे व्यवसाईक दृष्टीने दुर्लक्ष होत असावे त्याकरीता वरणगाव येथील गायरान जमिनीकडे लक्ष देणे अवघड असू शकते म्हणुन संस्था चालकांच्या वारसांकडून काही स्थानिकांनी स्टॅम्प पेपरवर मातीमोल दरात करोडो रूपयांच्या जामिनी फस्त केल्याचे चित्र समोर आहे. तर विना स्टॅम्प पेपरचे गायरानच्या जांगावर काहींनी अतिक्रमणे देखील केले आहे. वास्तविक पाहता जुनेलोक व वयस्कांच्या माहितीवरून पुर्वीपासुन गौ-संरक्षण संस्थाचालकांनी वरणगाव बसस्थानक परीसरात गरीब व बाहेरगावचे प्रवाशी, वारकरी, भाविक भक्तांकरीता मोफत किंवा अल्पदरात धर्मशाळा देखील बांधली होती. त्या समोर पिण्याच्या पाण्याकरीता पाय विहिर देखील होती आज हि अवशेष जीवंत आहेत. धर्मशाळेचे संस्थापक धर्मगुरू संस्थाचालक या ठिकाणी रात्रंदिवस सेवा देत असल्याचे सांगीतले जाते.

मात्र कालांतराने अग्रवाल समाजातील धर्मगुरू पती-पत्नी यांनी धर्मशाळेच्या आवारात जीवंत समाधी घेतल्याचे सांगीतले जाते. आजही या समाधी जशाच्या तशाच उभ्या आहेत. मात्र या समाध्यांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. अतिक्रमणधारकांनी समाधींना पत्र्यांचा आडोसा निर्माण करून त्या पाडण्याचा त्यांचे अवशेष मिटवण्याचा प्रयत्न सुरू केला असुन त्या जमिनी ताब्यात घेण्याचा कट चालवला जात असतांना नगरपरिषदेचे अधिकारी मात्र बघ्याची भुमिका घेतांना दिसत असले तरी अग्रवाल समाजाच्या मात्र भावना दुखावल्या जात आहे. नगरपरिषदेने अतिक्रमणाने विळखा घातलेल्या समाध्या मोकळ्या कराव्या, अन्यथा नागरीकांच्या भावना भडकल्यास त्याला नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याचे शहरात बोलले जात आहे.

सांभाळलेल्या जमीनी भाडे पट्टयाने - वरणगाव शहरातील बसस्थानक परिसरात गोरक्षण संस्थेच्या जामिनींवर अतिक्रमण धारकांनी अतिक्रमणे करून भाडेपट्टयाने देऊन गोरखधंदा सुरु केला आहे. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असली तरी यातून पालिकेला एक रुपया देखील उत्पन्न नसतांना पालिका अधिकारी व कर्मचारी वर्ग अतिक्रमण न काढता मात्र बघ्याची भूमिका घेत असतांना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com