प्राध्यापकांंचे तीन महिन्यांपासून पगार रखडले

समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचारी वेठीस; समाजकल्याण सहा.आयुक्तांना निवेदन
प्राध्यापकांंचे तीन महिन्यांपासून पगार रखडले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, चोपडा आणि धुळे येथील समाजकार्य महाविद्यालयातील (College of Social Work) प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे (faculty and non-teaching staff) गेल्या तीन महिन्यांपासून पगार (salaries) रखडले आहे. यासंदर्भात समाज कल्याण विभागाचे (Social Welfare Department) सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner) यांच्या कार्यालयात जाऊन भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्नित एन.मुक्ता या प्राध्यापक संघटनेच्यावतीने (Faculty Association) विविध समस्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांचे प्रतिनिधी व कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.यावेळी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.नितीन बारी, केंद्रीय सचिव डॉ.अविनाश बडगुजर, केंद्रीय कार्यकारणीचे सहसचिव डॉ. नितीन बडगुजर, सदस्य प्रा.डॉ. अस्मिता सरवैया, प्रा. चंद्रशेखर बोरसे आदी उपस्थित होते.

प्रा.डॉ. नितीन बारी यांनी समाजकार्य महाविद्यालयाचे सातत्याने प्रश्न हे ऐरणीवर येत असतात समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे वेतन नियमित वेळेवर न होणे ही अत्यंत अन्यायकारक बाब असून याबाबत आपण त्वरित निर्णय घ्यावा तसेच समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी असलेल्या सातव्या वेतन आयोगामधील कॅसबाबत दुरुस्ती तातडी बिने करण्यात यावी; अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

याबरोबरच समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांचे सातव्या वेतन आयोगाचा फरक,कॅसचे फरक इत्यादी विषयांवर देखील सकारात्मक चर्चा करण्यात आली. कार्यालय अधीक्षक राजेंद्र कांबळे यांनी उत्तर देताना सर्व निवेदनकर्त्यांच्या भावना या वरिष्ठ कार्यालयामध्ये पाठवण्यात येतील व नियमित वेतनाच्या प्रश्ना बाबत बोलताना आजच सीएमपी झाली असल्याचे सांगण्यात आले व यापुढे देखील या बाबतीत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यावतीने दिले.

एन. मुक्ता संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा

धुळे जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव येथील समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून पगार होत नसल्याने व्यथित आहेत. त्यासंदर्भात सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्याशी संघटनेच्या वतीने दूरध्वनीवरून चर्चा करून परिस्थितीचे गांभीर्य समजावून देण्यात आले. त्यावर योगेश पाटील यांनी देखील सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com