रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता खुला

दखल । राष्ट्रवादी अर्बन सेलच्यावतीने मनपा आयुक्तांकडे केली होती तक्रार
रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता खुला

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

गोविंदा रिक्षा स्टॉप (Govinda rickshaw stop) व नेहरु चौकातून (Nehru Chowk) खान्देश सेंट्रल मॉलकडून (Khandesh Central Mall) रेल्वे स्थानकाकडे (train station) जाणारा मार्ग गेट लावून बंद करण्यात आला होता. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्यावतीने (Nationalist Congress Urban Cell) आयुक्तांकडे (Commissioner) तक्रार (Complaint) करुन रस्ता सार्वजनिक वापरासाठी खुला (Road for public use) करावा. अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मनपा आयुक्तांच्या आदेशांन्वये नगररचना विभागाने (Town Planning Department) त्या संदर्भात पाहणी केली.

दरम्यान, बंद केलेला रस्ता सार्वजनिक वापराकरीता खुला करण्याचे आदेश नगररचना सहाय्यक संचालकांनी दिला आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता आता कायमस्वरुपी खुला (Open) होणार आहे.

खान्देश सेंट्रलकडून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद (Road closed) केल्याने प्रवाशांसह नागरिकांची गैरसोय (Inconvenience) होत होती. त्यामुळे गोविंदा रिक्षा स्टॉप व नेहरु चौक येथून जाणारा रस्ता मोकळा करावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्षा तथा माजी नगरसेविका अश्विनी देशमुख (Former corporator Ashwini Deshmukh) यांनी मनपा आयुक्त यांच्याकडे केली होती. या तक्रारीची देखल घेवून मनपा आयुक्तांनी नगररचना विभागाला प्रत्यक्ष जागेची पाहणी (Site inspection) करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार नगररचना विभागाने जागेची पाहणी करुन आयुक्तांकडे अहवाल दिला होता. दरम्यान, आयुक्तांच्या मान्यतेने रेल्वे स्थानकाकडे जाणारा पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण 24 मीटर रुंद रस्त्यावर एका बाजुला लावलेले गेट काढून सार्वजनिक वापराकरीता (public use) रस्ता मोकळा करावा. असे आदेश नगररचना सहाय्यक संचालकांनी दिले आहे. त्यामुळे आता हा मार्ग सार्वजनिक वापराकरीता कायमस्वरुपी खुला ठेवण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.