महसूल कर्मचार्‍यांच्या पाठलागामुळे वाळूच्या ट्रॅक्टरने रिक्षाला उडविले

शिवकॉलनी स्टॉपवरील घटनेत रिक्षा चक्काचूर; विचित्र अपघातात रिक्षाचालक बालंबाल बचावला
महसूल कर्मचार्‍यांच्या पाठलागामुळे वाळूच्या ट्रॅक्टरने रिक्षाला उडविले

जळगाव - jalgaon

शहरातील शिवकॉलनी स्टॉपवर (National Highways) राष्ट्रीय महामार्गावर वाळूने भरलेल्या (Tractor) ट्रॅक्टरने उभ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेत रिक्षा चक्काचूर झाली असून रिक्षावरील चालक रिक्षाच्या शेजारी उभा असल्याने सुदैवाने बचावला आहे. दरम्यान वाळूच्या ट्रॅक्टरचा महसूल विभागाचे कर्मचारी कारवाईसाठी पाठलाग करत असल्याने पकडले जावून या भितीने वेगाने ट्रॅक्टर चालविण्याच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

वाळूने भरलेल्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने शिवकॉलनीजवळ एमएच १९ व्ही ३४४१ या क्रमांकाच्या उभ्या प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्याच वेळी काही अंतरावरून मुरूमाने भरलेला दुसरा ट्रॅक्टर समोरून येत असतांना वाळूच्या ट्रॅक्टरने रिक्षाला धडक देत थेट मुरुमाच्या ट्रॅक्टरलाही धडक दिली.

या विचित्र अपघातात संपूर्ण रिक्षा चक्काचूर झाली. अपघात घडला त्यावेळी, रिक्षाचालक मजरखान सखावत खान (वय-३०) रा. पिंप्राळा हुडको,जळगाव हे सुदैवाने रिक्षात बसलेले नव्हते. ते त्यांच्या रिक्षाच्या बाजूला उभे असल्याने बालंबाल बचावले. अपघातानंतर धडक देणार्‍या वाळू ट्रॅक्टरवरील चालकाने उडी मारली. अन् ट्रॅक्टर घटनास्थळावर सोडून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून वाळूचे टॅ्रक्टर जप्त केले आहे. शेवटचे वृत्त हाती तोपर्यंत याअपघातप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com