रिक्षाचालकाचे प्रामाणिकपणाचे दर्शन

पोलीस उपअधीक्षकांनी प्रशस्तीपत्र देत केला सत्कार
रिक्षाचालकाचे प्रामाणिकपणाचे दर्शन

जळगाव -Jalgaon

रिक्षात राहून गेलेल्या पैशांची पिशवीसह इतर कागदपत्रे बँकेत नोकरील असलेल्या दिव्यांग कर्मचार्‍याला परत करुन रिक्षाचालक विजय प्रकाश पाटील यांनी समाजासमोर प्रामाणिकाचा अनोखा आदर्श ठेवला आहे. या प्रामाणिकापणाबद्दल रिक्षाचालक विजय प्रकाश पाटील यांचा पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या प्रशस्तीपत्र तसेच पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

दिव्यांग परमेश्‍वर दत्तू पाटील हे अजिंठा चौफुली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत नोकरीला आहेत. ३ ऑगस्ट रोजी परमेश्‍वर पाटील हे अजंठा चौफुली येथून खोटेनगर जाण्यासाठी विजय प्रकाश पाटील यांच्या रिक्षात बसले. विजय पाटील यांनी प्रवासी परमेश्‍व पाटील यांना सोडले. त्यानंतर परत निघाले.

यादरम्यान त्यांच्या विजय पाटील यांना रिक्षात प्रवासी परमेश्‍वर पाटील यांची रोख रक्कम २० हजार ५०० रुपये व इतर महत्वाची कागदपत्रे राहिलेली पिशवी दिसून आली. कुठलीही वेळ न वाया न घालवता विजय पाटील यांनी संबंधित पिशवीतील कागदपत्रांच्या आधारे प्रवाशी परमेश्‍वर पाटील यांचा संपर्क क्रमांक हुडकून काढला. त्यानंतर त्यावर संपर्क साधून रिक्षाचालक विजय पाटील यांनी प्रवाशी परमेश्‍वर पाटील यांना त्यांची रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवी परत केली.

रक्कम तसेच कागदपत्रे असलेली पिशवी परत रिक्षाचालक विजय पाटील यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहेत. दरम्यान बुधवारी या प्रकाराबाबत पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांना कळाले असता, त्यांनी विजय पाटील यांना पोलीस उपअधीक्षक कार्यालयात बोलावून पोलीस दलातर्फे प्रशस्तीपत्र तसेच पुष्छगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला. दरम्यान विजय पाटील यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com