चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

चोपडा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींचा  निकाल जाहीर

चोपडा Chopda  (प्रतिनिधी )


  तालुक्यातील हातेड खु !,खडगाव,गोरगांवले खु! वटार व सनपूले या पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत (Gram Panchayat Elections) लोकनियुक्त सरपंचपदासाठी मतमोजणी सुरुवात होऊन एक तासात तहसीलदार अनिल गावित यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक नायब तहसीलदार सचिन बांबळे, सहाय्यक निवडणुक अधिकारी नरेंद्र सोनवणे यांनी निकाल (result) जाहीर केला.

चोपडा तालुक्यात हातेड खु !,खडगाव,गोरगांवले खु!,वटार व सनपूले या ग्रामपंचायती मध्ये पाच लोकनियुक्त सरपंचांपैकी हातेड खु! येथे शालिनी रमेश सोनवणे तर सनफुले येथे पुंजु अर्जुन कोळी हे लोकनियुक्त सरपंचपदी बिनविरोध निवडून आले होते

तसेच १८ सदस्य देखील माघारी अंती बिनविरोध निवडून आले होते.खडगाव,गोरगांवले खु!,वटार या गावात लोकनियुक्त सरपंचपदासाठी ७ उमेदवार तर २५ सदस्यांच्या जागेसाठी ४९ उमेदवार रिंगणात होते.दरम्यान आज मंगळवारी झालेल्या मतमोजणीत गोरगांवले खु ! येथे देवका़बाई भिकन फुगारे,वटार येथे भिकुबाई सुभाष कोळी तर खडगाव येथे कविता रविंद्र चव्हाण या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.   

ग्रामपंचायतींच्या मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी तथा निवडणुक नायब तहसीलदार सचिन बांबळे,नायब तहसीलदार देवेंद्र नेतकर,रविंद्र माळी,सहाय्यक निवडणुक अधिकारी नरेंद्र सोनवणे,मंडळ अधिकारी मनोज साळुंखे,अव्वल कारकुन हेमंत हरपे,महेश पानघंटीवार,किरण सांळुखे, शहर तलाठी किरण महाजन,अजय पावरा यांचेसह महसूल अधिकारी,तलाठी व कोतवाल आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलेत.

यावेळी शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित सावळे,संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक घनश्याम तांबे,पोहेकॉ.सुनिल पाटील,पोहेकॉ.जितेंद्र सोनवणे,पोहेकॉ.प्रदीप राजपूत,पोहेकॉ.दीपक विसावे,पोना.विलेश सोनवणे,पोना. ज्ञानेश्वर जवागे,पोना.किरण गाडीलोहार,पोना. मधुकर पवार,पोकॉ.किरण पाटील तसेच शहर,ग्रामीण व अडावद पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. 

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com