बीएचआर ,गुन्हे शाखेने नोंदविले 26 जणांचे जबाब

जामनेर शहरासह बीएचआरच्या कार्यालयात दिवसभर चौकशी
बीएचआर ,गुन्हे शाखेने नोंदविले 26 जणांचे जबाब

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी (BHR scams) जळगाव जिल्ह्यात चौकशीसाठी दाखल झालेल्या पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या (Pune Economic Crimes Branch) पथकाने मंगळवारी जामनेर व बीएचआरच्या मुख्य कार्यालयात जाऊन दिवसभर चौकशी (Inquiry) केली. तसेच 26 जणांचे जबाब नोंदविले (recorded the answers)असल्याची माहिती पोलीस निरिक्षक संदीप भोसले (Police Inspector Sandeep Bhosale) यांनी दिली.

डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई सुरु आहे. या या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींच्या अनुषंगाने संबंधित ठेवीदारांचे जबाब नोंदविले जात आहे. या पथकाने सोमवारी राजकीय क्षेत्रासह उद्योजक, निविदा भरणारे, ठेवीदार व इतर अशा 28 जणांचे जबाब नोंदविले होते. पथकाने मंगळवारी बीएचआरच्या मुख्यालयात जाऊन अवसायक चैतन्यकुमार नासरे यांची भेट घेऊन काही वेळ चर्चा केली. तसेच दुसर्‍या दिवशी 26 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यात जामनेर शहर व तालुक्यातील काही जणांना प्रत्यक्ष भेटून त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम, पावत्या मॅचिंग, मिळालेली रक्कम आदीबाबत चौकशी करुन जबाब नोंदविण्यात आले असल्याची माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली.

Related Stories

No stories found.