प्रकल्पग्रस्तांना प्रशिक्षण घेता-घेता केले सेवानिवृत्त

महानिर्मिती प्रकल्पग्रस्त भरतीचा भोंगळ कारभार : न्याय न मिळाल्यास 26 नोव्हेंबरला आत्मदहन करणार
दीपनगर
दीपनगर

फेकरी, Fekri ता.भुसावळ । वार्ताहर

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र (Bhusawal Thermal Power Station) दीपनगर (Deepnagar) येथील प्रकल्पग्रस्तांना (Project victims) नोकरी न देता दिशाभूल (Misguided) करून त्यांचे शोषण करीत असल्याचा आरोप (Accusation) प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी (project affected farmers) केला आहे.

याबाबत सविस्तृत असे की, सर्व प्रकल्पग्रस्तांनी भुसावळ औ.वि.केंद्र दीपनगर या प्रकल्पास शेतजमीन दिलेल्या आहेत. परंतु त्यांना नोकरीसाठी शासन निर्णय व महानिर्मितीचे प्रशासकीय परिपत्रके असताना सुद्धा, महानिर्मितीच्या अधिकार्‍यांनी याचे काटेकोरपणे पालन न करता त्यांना नोकरीपासून वंचित ठेवले आहे. महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक क्र. 118 दि.6 जून 2010 अन्वये प्रगत कुशल प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आणि त्यामध्ये प्रशिक्षणाचा कालावधी हा एक वर्षाचा असताना प्रकल्पग्रस्तांचे वय 45 वर्ष पूर्ण झाल्याने शासन आदेशानुसार नोकरी पासून वंचित राहून प्रशिक्षणामध्ये त्यांचे वय 58 वर्षे पूर्ण होऊन प्रशिक्षणामध्ये संपुष्टात आले.

शासन निर्णय क्र. 1006/ मु.स.396/प्र.क्र.56/06/16अ, दि. 3 फेब्रुवारी 2007 नुसार वयाची 45 वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची तरतूद नाही. परंतु हे शासन निर्णय परिपत्रक महानिर्मितीच्या अधिकार्‍यांनी सदर निर्णयाची अंमलबजावणी मंडळ ठराव क्र.2015/1822 दि.25 ऑगस्ट 2015 रोजी अध्यक्ष व तथा व्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती संचालक, प्रकल्प संचालक, संचालन संचालक वित्त यांच्याशी विचार विनियम करून 45 वर्षे पूर्ण केलेल्या उमेदवारांना निर्वाहभत्ता योजना ही महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक क्र. 315 हे कोणत्याही शासन निर्णयाचा आधार नसताना बळजबरीने लादून लागू केला.

भुसावळ औ.वि.केंद्र दीपनगर येथील प्रकल्पास 54 वर्षे पूर्ण झाले आहेत आणि प्रकल्पग्रस्तांच्या शासन आदेशाला 42 वर्षे पूर्ण झाले व महानिर्मितीच्या उर्वरित व पात्र प्रकल्पग्रस्तांच्या योजनेस 12 वर्षे पूर्ण झाले व यादरम्यान आजपर्यंत या योजनेतून तंत्रज्ञ-3 ची चार वेळा भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच सन 2010 पासून महाराष्ट्रात प्रकल्पासाठी कुठेही जमीन संपादन झालेली नाही, तरीही प्रकल्पग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. याबाबतचे सूत्र आजपर्यंत स्पष्ट झालेले नाही की, हे प्रकल्पग्रस्त आले तरी कुठून? याबाबतची ही चौकशी करण्यात यावी.

दीपनगर
Visual Story # क्रितीचा ‘ठुमकेश्वरी’ अंदाज पाहिलात का?

महानिर्मिती अधिकार्‍यांच्या नियमबाह्य कामामुळे प्रकल्पग्रस्तांवर फार मोठा अन्याय झालेला आहे. परंतु नियमबाह्य काम करणार्‍यांना कुटुंबासहित सुविधा दिल्या जात आहेत. आणि प्रकल्पाला जमीन देणारे शेतकरी न्याय व हक्कापासून आजही वंचित आहेत. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन दोषींवर दंडात्मक कारवाई करावी.

अन्यथा येत्या 26 नोव्हेंबरला जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सुरेश बळीराम चौधरी, सुदेश पाटील, सहदेव कोळी, पद्माकर तायडे, भागवत चौधरी, किशोर पाटील या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी मागणीसह दिला आहे.

दीपनगर
श्री मंगळ ग्रह मंदिरात झाला तुळशी चा शाही विवाह महासोहळा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com