रस्त्यात गोंधळ घालणार्‍याने पोलिसांची काढली लायकी

रस्त्यात गोंधळ घालणार्‍याने पोलिसांची काढली लायकी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

भर रस्त्यात (road) दुचाकी उभ्या (standing the bike) करुन वाहनचालकांना दमदाटी (Fatigue for drivers) करणार्‍याला पोलिसांनी रोखले (Police stopped). यावेळी पोलिसांची लायकी (Worthy of the police) काढत त्यांना नोकरी घालविण्याची धमकी (Threat of job loss)देवून त्यांना शिवीगाळ (abuse) केल्याची घटना हॉटेल टुरीस्टजवळ (Near Hotel Tourist) सोमवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस ठाण्याचे विजय निकुंभ, प्रफुल्ल धांडे हे रात्री गस्तीवर होते. त्यांच्या हद्दीतील अस्थापना बंद करण्यासाठी ते रात्री 10.30 वाजेच्या सुमारास नेहरु चौकात गेले असता, यावेळी त्यांना हॉटेल टुरीस्टसमसोर वाहनांची गर्दी दिसली. पोलिसांनी याठिकाणी जावून पाहीले असता, येथे (एमएच 35 एआर 0031), (एमएच 19 एपी 1290), (एमएच 19 सीझेड 1107) व (एमएच 19 डीएच 5577) ही वाहने रस्त्यावर उभ होती.

या वाहनावरील व्यक्ती राजेंद्र भगवान पाटील (वय-38, रा. मारोतीपेठ) हा याठिकाणी जमलेल्या वाहनचालकांना शिवीगाळ देखील करीत होता. गस्तीवर असलेले प्रफुल्ल धांडे व बापू मोरे हे त्याला रस्त्यावर गोंधळ घालू नका, असे समजविण्यासाठी गेले असता, राजेंद्र पाटील याने पोलीस कर्मचारी बापू मोरे यांना दमदाटी करीत शिवीगाळ केली.

झटापटीत पोलीस कर्मचारी जखमी

तरुणाकडून झालेल्या झटापतीत तो त्यांच्या अंगावर धावून आल्याने प्रफुल्ल धांडे यांच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. दरम्यान, त्या तरुणाला पोलिसांनी वाहनात बसवून शहर पोलिसात आणले. याठिकाणी त्याची विचारपूस करीत त्याच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन् पोलिसांशी झाली झटापट

पोलिसाला शिवीगाळ करीत असलेल्या राजेंद्रला त्याच्यासोबत असलेल्यांनी समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तसेच तो पोलिसांना उद्देशून तुमची काय लायकी आहे, तुमच्या नोकर्‍याच घालवितो, तुम्ही मला ओळखले नाही असे म्हणत तो पोलिसांच्या अंगावर धावून आला. पोलिसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता राजेंद्रकडून पोलिसांना धक्काबुक्की देखील करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com