
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
शहरातील एक सेवानिवृत्त महिला कर्मचार्यावर पाळत ठेवून तिच्या पर्समधून सोनाराकडून घेतलेल्या सोन्याचा बांंगडया (Gold bangle) लांबविणार्या चौघा महिलांना नागरिकांच्या मदतीने शहर पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
याबाबतची सविस्तर वृत्त असे की, शहरातील मदिना मशीद जवळील रझा नगर, हुडको कॉलनीत राहणारी सेवानिवृत्त महिला अफसाना जहीरउद्दीन पंजाबी या महिलेने शहरातील सायरचंद मोतीलाल ज्वलेर्स या दुकानातून काल दि.११ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेेच्या सुमारास ४३ ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगडया खरेदी केल्या आणि त्या पर्समध्ये ठेवून सदर महिलाही जुन्या नगरपालिक जवळील बाजारपेठेत आंबे (Mangoes) खरेदी करण्यासाठी गेले.
आंबे खरेदी करत असताना, आधिपासून तिच्यावर पाळत ठेवून असलेल्या चौघा अनोळखी महिलांनी अफसाना पंजाबी यांना घेराव घालत, अंगलट आल्या. यावेळी पर्सला कोणीतरी हात लावला अशी शंका अफसाना पंजाबी यांना आल्यानंतर लागलीच त्यांनी पर्स मधील बांगडया शोधल्या असत्या. त्याना मिळून न आल्याने त्यांनी लागलीच आरडाओरडा केली. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी तीन महिलांना पकडून ठेवले. त्यातील एक महिला पळून जाण्यात यशस्वी झाली.
याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी या तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस करता त्यांनी त्यांची नावे राणी दिपक राक्षे, आशाबाई गणेश कांबळे, सुलोचना अर्जुन संकट अशी सांगून पळून गेलेली महिला अनिता दिनू फाजणे सर्व रा.चंदनपुरी ता.मालेगांव असे सांगून तिच्या जवळ चोरून नेलेला मुद्देमाल असल्याचे या महिलांनी पोलिसांना सांगितल्यानंतर तिच्या शहरात सर्वत्र शोध घेतला, परंतू ती मिळुन आली नाही.
अखेर गुप्त माहितीवरून पळून गेलेली या महिलेला पिर मुसा कादरी दर्गा परिसरातील झोपडयातून पोलिसांनी ताब्यात घेतले. या महिलेने २ लाख ४० हजार किंमतीच्या ४३ ग्रॅम वजनाच्या चार बांगडया पोलिसांना काढून दिल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.