प्रशासकीय काळात सामान्य नागरिकांचे हाल!

माजी सभापती गणेश पाटील यांचा आरोप
प्रशासकीय काळात सामान्य नागरिकांचे हाल!

बोदवड - प्रतिनिधी Bodwad

पंचायत समिती जिल्हा परिषद (Panchayat Samiti Zilla Parishad) कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपल्यापासून या ठिकाणी प्रशासक (administrator) काम करत आहे. परंतु या प्रशासकीय काळात सामान्य नागरिकांची कामे होत नाहीत. अधिकाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे सामान्य माणसाला नाहक त्रास होत आहे, असा आरोप बोदवड पंचायत समितीचे माजी सभापती गणेश पाटील यांनी केला आहे.

प्रशासकीय काळात सामान्य नागरिकांचे हाल!
Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा...!
प्रशासकीय काळात सामान्य नागरिकांचे हाल!
Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा...!

यामध्ये घरकुल विभागातील तक्रारी आहेत कोणचे बिल वेळेत निघत नाहीत, नवीन घरकुलाना मान्यता दिली जात नाही. अश्या अनेक अडचणी घरकुल लाभार्त्यांना येत आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कोणत्याही नवीन कामना मान्यता दिली जात नाही. गायगोठे, वृक्ष लागवड , शेत रस्ते सर्व कामे प्रलंबित आहेत. तर मनरेगा मधून रोजगार मिळत नाही, तसेच केलेल्या कामची बिले लवकर मिळत नसल्यामुळे सामन्यांना त्रास होत आहे.

शेष फंडातून राबवण्यात येणाऱ्या वयक्तीक लाभाच्या योजना राबवल्या जात नाहीत. अपंग नागरिकासाठी राखून ठेवण्या त आलेला निधी खर्च केला जात नाही. गावाच्या विकासासाठी केंद्राने दिलेला 15 वा वित्त आयोगाचा निधी अखर्चित असल्यामुळे ग्रामीण भागाचा विकास थांबला आहे. काही अधिकारी सामान्य नागरिकांना कामासंदर्भात व्यवस्थित वागणूक देत नाहीत.

पंचायत समिती वा जिल्हा परिषद निवडणुका न झाल्यामुळे त्याठिकाणी सामान्य नागरिकासाठी काम करणारे सदस्य नसल्यामुळे सामान्य नागरिकांच्या अडचणी कोणापाशी मांडाव्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्य निवडणूक आयागाने याची दखल घेऊन वेळेत निवडणुका घेऊन सामन्य नागरिकांचं हाल थांबवले पाहिजेत. त्याच्याबरोबर पंचायत राज टिकले पाहिजे याचाही विचार झाला पाहिजे.

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,निवडणूक आयोग , राज्यपाल यांनी याबाबतीत गांभीर्याने विचार करून लवकर निवडणुका घेऊन सामन्यानां होत असलेल्या अडचणींना न्याय दिला पाहिजे.

प्रशासकीय काळात सामान्य नागरिकांचे हाल!
Visual Story ‘बाहुबली’ फेम शिवगामीच्या या साडीची चर्चा...!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com