राज्यात सुरू असलेल्या जातीयवादाकडे लक्ष न देता जळगावकरांनी दिला एकोप्याच्या संदेश

राज्यात सुरू असलेल्या जातीयवादाकडे लक्ष न देता जळगावकरांनी दिला एकोप्याच्या संदेश

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राज्यात (state) एकीकडे राजकीय (Political) आणि सामाजिक वातावरण (Social environment) सध्या गढूळ झालेले असताना जळगावात मात्र युथ फॉर हेल्प फाऊंडेशन (Youth for Help Foundation) आणि एकता ग्रुपतर्फे (Ekta Group) इफ्तार पार्टीद्वारे (Iftar party) एकात्मतेचा संदेश (message of unity) देण्यात आला. रमजान महिन्यानिमित्त सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात सुरु असलेल्या जातीयवादाकडे लक्ष न देता (without paying attention to the ongoing casteism) सर्वांनी आपसात समन्वय ठेऊन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवावी असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

नेहरू युवा केंद्र (Nehru Youth Center)जळगाव संलग्नित युथ फॉर हेल्प फाऊंडेशन आणि एकता ग्रुपतर्फे रमजान महिन्यानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे (Rosa Iftar Party) आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा, माजी उपमहापौर करीम सालार, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, उपनिरीक्षक सुरेश सपकाळे, डॉ.विवेक जोशी, नदीम मलीक, काँग्रेसचे अमजद पठाण, आदी उपस्थित होते. राज्यासह जिल्ह्यात सध्या जातीय तेढ निर्माण करणार्‍या घटना वाढत आहे.

सोशल मीडियात (social media) भडकावू आणि अफवा पसरविणारे मेसेज पाठविले जात आहे. भारत हा विविधतेने नटलेला आणि सर्वधर्म समभाव असलेला देश आहे. आपल्या जिल्ह्याची शांतता टिकवून (Maintaining peace) ठेवणे सर्वांची जबाबदारी आहे. हिंसा करण्याची शिकवण कोणताही धर्म देत नाही. संयम, नियंत्रण ठेवण्याची आपली क्षमता आपल्याला उपवास आणि रोजातून समजते असे मान्यवरांनी सांगितले. सायंकाळी 6.45 वाजता रोजा सोडल्यानंतर सर्वांनी अल्पोहार घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहेल अमीर शेख, प्रास्ताविक चेतन वाणी तर आभार वसीम खान यांनी मानले. कार्यक्रमासाठी इम्रान खान, अजहर खान, जकी अहमद, जावेद शेख, यासीर खान, फिरोज शेख, शाहरुख खान, तौसिफ़ खान, शाहिद खान, नझर खान, समीर खान, रेहान अली, इरफान सालार, आरिफ शेख, इसरार खान, फहीम खान, सोहेल खान, कमलेश देवरे, कृणाल महाजन आदींनी परिश्रम घेतले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com