गुजरातची जनता तुपाशी, महाराष्ट्रातील जनता उपाशी

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसने उडविली कागदी विमाने
गुजरातची जनता तुपाशी, महाराष्ट्रातील जनता उपाशी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उद्योग (Industries of Maharashtra) गुजरातच्या (Gujarat) घशात घालणार्‍या शिंदे फडवणीस सरकारच्या (Shinde Fadwanis Govt) विरोधात (against) राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (NCP) कागदी विमाने उडवून (flying paper airplanes) आंदोलन (movement) करण्यात आले. यावेळी गुजरात तुपाशी (Gujarat Tupashi,), महाराष्ट्र उपाशी (Maharashtra is starving) अशी घोषणाबाजी (Sloganism) पदाधिकार्‍यांनी केली.

वेदांता फॉक्सकॉन, टाटा एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात स्थलांतरित झाल्याबद्दल तसेच युवकांच्या पोलिस भरतीवर स्थगिती आणल्या बद्दल व युवकांना रोजगाराचे खोट्या आश्वासनांचे गाजर दिल्याबद्दल आंदोलन करण्यात आले. आंदोलनांत मोदी, शहा , शिंदे, फडवणीस, उदय सामंत यांचे फोटो असणारी कागदी विमाने हवेत उडवून शिंदे-फडणीस सरकार विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

यांचा होता सहभाग

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक महानगर अध्यक्ष रिकु चौधरी, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, अमोल कोल्हे, किरण राजपूत, भगवान सोनवणे, ईब्राहिम तडवी, सुशील शिंदे, साहिल पटेल, रफिक पटेल, चेतन पवार, योगेश साळी, नरेंद्र शिंदे, रहीम तडवी, खलील शेख, हितेश जावळे, शैलेश अभंगे, योगेश कदम, सचिन साळुंखे, विनोद धुमाळ, आकाश हिरवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com