
चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिध
तालुक्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीची (election) धामधुम नुकतीच संपली. ही निवडणुक संपूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात गाजली ती शैक्षणिक क्षेत्रातील राजकारणामुळे व वारेमाप वाटलेल्या पैशांमुळे. आता निवडणुकीनतंर एक-एक गुपित बाहेर येत असून अनेक चर्चांना उत आला आहे.
निवडणुकीत जवळपास तीन ते चार कोंटीचा खर्च झाल्याची चर्चा आहे. यात प्रचंड पैशांची वाटप केल्याची चर्चा आहे, परंतू ज्याच्यांवर पैसे वाटपाची जबाबदारी सोपण्यात आली होती. आशा वाटपकर्त्यांनी इच्छीतस्थळी २५ ते ३० हजारांचे जड वजनाचे पाकिट न पोहचवल्यामुळे निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले असून अनेक मातब्बरांना दगाफटका सहन करावा लागला आहे. आता आपला पराभव का ? झाला, या कारणाचा ते कसून शोध घेत आहे.
राष्ट्रीय मंडळाच्या निवडणुकीत सोमवारी धक्कादायक निकाल लागला. नानासाहेब य.ना.चव्हाण स्मृती पॅनलने १९ पैकी १७ जांगावर दणदणीत विजय प्राप्त केला. तर विकास पॅनलचा अक्षरशा; धुव्वा उडवला. विकास पॅनलच्या अवघ्या दोन जागा विजयी झाल्या आहेत. राष्ट्रीय विद्यालयाची निवडणुक सुरुवातीपासून वादळी ठरली होती. यात शैक्षणिक क्षेत्रातील मातब्बरांसह खासदार व आमदारांनी प्रत्यक्षात सहभाग घेतला होता. दोन्ही पॅनलमध्ये तगडे उमेदवार उभे करण्यात आले होते. या निवडणुकीत जवळपास तीन ते चार कोटी रुपयांची वाटप झाल्याची चर्चा आहे.