पक्षी प्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजण्याची आवश्यकता- प्राचार्य अरविंद चौधरी

पक्षी प्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजण्याची आवश्यकता- प्राचार्य अरविंद चौधरी

बोदवड - प्रतिनिधी Bodwad

चिमणी संवर्धन (Chimney conservation) ही काळाची गरज आहे. चिमणीला अंडी घालण्यासाठी कृत्रिम इको फ्रेंडली घरटी (Eco friendly nest) हाच उत्तम पर्याय आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी यांनी केले.

बोदवड महाविद्यालयात (Bodwad College) पक्ष्यांच्या अधिवासाबाबत जनजागृतीपर उपक्रम नुकताच घेण्यात आला. बोदवड महाविद्यालयात विज्ञान विभागाच्या वतीने पर्यावरणपूरक अशी अनेक घरटी दानापाणीच्या व्यवस्थेसह चिमण्यांसाठी विज्ञान शाखेच्या इमारतींच्या व्हरांड्यात विविध ठिकाणी लावण्यात आली असून याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

सदर उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. अरविंद चौधरी यांनी केली. संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांच्या प्रोत्साहनातून सदर उपक्रम महाविद्यालयात आणि शाळेत राबविण्यात येत आहे.

या उपक्रमासाठी शास्त्रोत्सव विभागाचे प्रमुख पर्यावरणप्रेमी डॉ रुपेश मोरे तसेच डॉ.गीता पाटील डॉ.चेतन शर्मा, नरेंद्र जोशी, डॉ.वंदना नंदवे, सौ.कांचन दमाडे, डॉ.अनिल बारी, नितेश सावदेकर, डॉ.रूपाली तायडे, सौ.रूपाली चौधरी, बी.टी.हिवराळे, समीर पाटील, नामदेव बडगुजर, राजू मापारी, दीपक जोशी, विजय धोबी, वैभव माटे यांचे सहकार्य लाभले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com