वधू-वर परिचय मेळावा काळाची गरज!

आ. राजूमामा भोळे यांचे प्रतिपादन, नागवेल प्रतिष्ठानतर्फे बारी समाजाच्या वधू-वर परिचय मेळावा
वधू-वर परिचय मेळावा काळाची गरज!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

समाजात एज्युकेटेड (educated candidates) उमेदवारांची संख्या वाढत आहे. मात्र, व्यावसाय किंवा नोकरीनिमित्त बाहेर (Out of town for work) गावी असलेल्या समाज बांधवांच्या भेटी-गाठी होत (no meeting of community members) नसल्याने वधू-वर परिचय मेळावा (Meet the bride and groom) ही आता काळाची (Need of time) गरज बनली आहे. प्रत्येक समाजात वधू-वर परिचय मेळावा होणे गरजेचे आहे. त्यामुळे लग्न जोडण्यास (Help to add marriage) मदत होते व होणारा खचार्र्ची देखील बचत होते, असे प्रतिपादन आ.राजूमामा भोळे (MLA. Rajumama Bhole) यांनी केले.

नागवेल प्रतिष्ठान आयोजित बारी समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी उपमहापौर विष्णू भंगाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.डॉ.नितीन बारी, शिरसोलीचे सरपंच प्रवीण बारी, उद्योजक यशवंत बारी, अमृत बारी, नगरसेविका शोभा बारी, मंगला बारी, अवधूत कोल्हे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे उप-वधू वर परिचय पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजातर्फे आमदार भोळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर जाहिरातदार व समाजातील उत्कृष्ट कार्य करणार्‍या मंडळींचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन प्रा.दीपक बारी यांनी तर आभार संगीता बारी यांनी मानले.

222 तरुण-तरुणींनी दिला परिचय

या बारी समाजाच्या वधू-वर परिचय मेळाव्यात 128 उपवधू तर 104 उपवरांनी आपला परिचय करून दिला. डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, सरकारी कर्मचारी अशा विविध उमेदवारांनी आपला परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य गेल्या चार महिन्यापासून परिश्रम घेत होते.

त्याचबरोबर अतुल बारी भूषण बारी, दीपक बारी, योगेश बारी, शरद वराडे, भास्करराव कोथलकर, प्रकाश रोकडे, सुशील बारी, नरेंद्र बारी, अर्जुन वराडे, कमलेश बारी, सतीश फूसे, प्रा.अनिल बारी, समाधान बुंदे, कर्ण बारी, ज्ञानेश्वर तेलंग्रे, भास्कर रोकडे, संदीप अस्वार, श्रीकांत बारी, आशिष बारी, सतीश बारी, राजीव पवार, योगानंद बारी, मिठाराम लावणे, महादेव धरमे, रामभाऊ वांडोळे, संतोष अस्वार मुंबई, विनोद लावणे, भास्कर पाटील, भरत बारी, राजेंद्र कोल्हे, आनंदा सुने, बी.डी.आगे, उमेश धुरडे, आनंदा ढगे, रमेश डबे आदींचे सहकार्य लाभले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com