Photos #शाळांमध्ये झाला विठ्ठल नामाचा गजर

आषाढी एकादशी । टाळ, मृदुंगाच्या गजरात चिमुकल्यांच्या दिंडीने वेधले लक्ष
Photos #शाळांमध्ये झाला विठ्ठल नामाचा गजर

जळगाव jalgaon।

आषाढी एकादशीच्या (Ashadi Ekadashi) पूर्वसंध्येला शहरातील विविध शाळांमध्ये (various schools) श्री.विठ्ठल-रुख्मिणी (Vitthal-Rukmini) आणि वारकर्‍यांचा (Warkaris) वेश परिधान करीत विठ्ठल नामाचा गजर सुरु होता. विद्यार्थ्यांनी (students) टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरत वातावरण भक्तीमय झाले होते. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही आषाढी एकादशीचा आनंदोत्सव (Ashadi Ekadashi Rejoicing) साजरा केला.

ए.टी.झांबरे विद्यालय

ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयातर्फे प्रबोधनात्मक दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण करण्यासाठी परिसरातील व्यावसायिक यांना कागदी पिशव्या वाटप करुन प्लॅस्टिक मुक्त व कचरा मुक्त जळगाव करण्यात सहकार्य करण्याचे आव्हान केले.

व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्त्व, कोरोनामुक्त भारत, स्वच्छता मोहीम, पर्यावरण संरक्षण इ.सामाजिक जनजागृतीपर फलक घेऊन परिसरात दिंडीचे आयोजन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी अभंग व भजने गात दिंडीची सुरुवात केली विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखमाई व वारकरी व संतांचा पोशाख परिधान करून तुळशी वृंदावन डोक्यावर घेत वारकरी संप्रदायाचे दर्शन घडविले व आस्वाद चौकातील विठ्ठल मंदिर परिसरात व्रुक्षारोपण करून दिंडीचा समारोप करण्यात आला.

दिंडीचे आयोजन मुख्याध्यापिका .प्रणिता झांबरे, शालेय सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

शकुंतला विद्यालय

शकुंतला जे. प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्यावतीने विद्युत कॉलनी परिसरात दिंडी काढण्यात आली. यात विद्यार्थी वारकर्‍यांच्या वेश परिधान केलेला होता. हरिनामाच्या गजरात हा दिंडी सोहळा पार पडला. ज्ञानोबा, तुकारामच्या गजरात परिसरात दिंडीत जयघोष करण्यात आला. दिंडीच्या मार्गात विद्यार्थ्यानी पावली, फुगडी खेळत, रिंगण घालत उत्साहात दिंडीचा आनंद लुटला.

त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिक राजश्री महाजन, नेहा जंगले, उल्हास भोळे, राहुल चौधरी, अरविंद सुरवळकर, स्वाती जंगले, सुनील नेहते, लक्ष्मी भालेराव, प्रतिभा चौधरी, भागवत चोपडे, हर्षा चौधरी, जयश्री झांबरे, सुरेखा मिस्तरी आदी उपस्थित होते.

रायसोनी विद्यालय

प्रेमनगर येथील बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये 9 जुलै रोजी विठूमाऊलीच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व प्रथम, वारकरी दिंडींचे आयोजन करण्यात आले होते. वारकरी दिंडींत विद्यार्थ्यांनी विठ्ठल- रुक्मीणी, वारकरी तर ताणी माथुरवैश्य ह्या विद्यार्थ्यीनीने रूख्मीणीचा पेहराव परिधान केला होता. जयेश कोळी या विद्यार्थ्याने विठ्ठलाचा पेहराव परिधान केला.

सर्व विद्यार्थ्यांनी टाळ, मृदूंग, वीणा तसेच विठ्ठल नामाच्या गजरात शाळेपासून ते भवानी मातेच्या मंदिरापर्यंत वारकरी दिंडी काढण्यात आली. पालखीचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी करुन आषाढी एकादशीचे महत्व सांगितले. पालखी सोहळ्याचे आयोजन झाल्यानंतर गायन स्पर्धा व फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये लहान मुलांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत जनाबाई अशा विविध भूमिका साकारल्या. संस्थेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उपाध्यक्ष उमेद रायसोनी व पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा ललिता टिपरे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.

355130548034101

प्रगती विद्यालय

विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेने चालविलेल्या प्रगती बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचे आयोजन केले होते.तसेच वर्गस्तरावर वक्तृत्व स्पर्धा व गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी विषयी माहिती सांगण्यात आली.

संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल, अध्यक्षा मंगला दुनाखे व सचिव सचिन दुनाखे यांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पालखी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल, विठ्ठल, हरिओम विठ्ठल या जयघोषात विठ्ठलाचे नामस्मरण केले. याप्रसंगी मुख्याध्यापक ज्योती कुलकर्णी, शोभा फेगडे, मनीषा पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प.वि.पाटील विद्यालय

गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष उमेश सूर्यवंशी, मुख्या. रेखा पाटील यांचे हस्ते तुलसीपूजन व पालखीपूजन करण्यात आले. तसेच शालेय परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. ऊन, सावलीच्या खेळाबरोबरच शाळेतील इयत्ता 1 ली ते 4 थीच्या वारकरी विद्यार्थ्यांनी तुळशीमाळ गळ्यात घालून डोक्यावर तुळस, हातात टाळ व मुखातून हरिनामाचा गजर करत गोलाकार रिगण करत पावली व फुगड्या खेळत अभगांचे गायन केले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रख्मिणी, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, संत जानेश्वर, मीराबाई, कान्होपात्रा यांच्या छान भूमिका साकारल्या. शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून हरिपाठाचे काही अभंग म्हटले. दिंडी संपल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना साबुदाणा, केळी तसेच राजगिरा लाडू यांचा फराळ शाळेतर्फे वाटप करण्यात आला. या आनंदोत्सवात शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय

मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये आषाढी एकादशीनिमित्त विशेष दिंडी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत वातावरण भक्तीमय केले होते. सकाळी विद्यार्थ्यांनी वारकर्‍यांच्या वेशभूषेत तसेच मुलींनी पारंपारिक वेश परिधान करून विद्यालयात उपस्थिती दिली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी कुर्ता पायजमा तर मुलींनी नऊवारी साडी घातली होती. मुलांनी वारकर्‍यांच्या वेशभूषांमध्ये दिंडीत सहभाग घेतल्याने चैतन्यमय वातावरण झालं होतं. दिंडीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मनमोहक मूर्ती ठेवलेल्या होत्या. पालखी पूजन व मूर्तिपूजन संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरुणचे नगरसेवक प्रशांत नाईक व संचालिका अर्चना नाईक यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात व लेझीम खेळून जल्लोष केला.

उपक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका शितल कोळी, संस्थेचे सचिव मुकेश नाईक, उज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, आम्रपाली शिरसाट, रूपाली आव्हाड, नयना अडकमोल, सोनाली चौधरी, स्वाती नाईक, प्रियंका जोगी, साक्षी जोगी, दिव्या पाटील, सोनाली जाधव, कोमल पाटील, पूनम निकम, मेघा सोनवणे, जयश्री खैरनार, शिल्पा कोंगे, योगिता सोनवणे, दिनेश पाटील आदींनी केले होते.

बाहेती विद्यालय

क्रीडा रसिक एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक विद्यालय आणि श्रीमती जानकीबाई आनंदराम बाहेती विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त इयत्ता 1 ली ते 10 वी.च्या सर्व विद्यार्थ्यांची विविध संत आणि वारकर्‍यांच्या वेशभूषेत महाबळ,नूतन वर्षा कॉलनी, चैत्रबन कॉलनी, शारदा कॉलनी परिसरात दिंडी काढण्यात आली. विद्यालयाच्या मैदानावर मुख्याध्यापक पी.आर.जाधव यांच्याहस्ते पालखीतील श्री.विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्तीची पूजा करण्यात आली.

दिंडी दरम्यान यावेळी प्राथमिक विद्यालयाच्या प्र. मुख्याध्यापिका रत्ना मालपुरे, चेतना महाजन, सायली डोळे, दिव्या इंगळे, माध्यमिक शिक्षक के.एच.पाटील,एन.एम.चौधरी,पी.एम.पवार, टी.एस.माळी, डी.जी.पाटील, शिक्षिका सरला चौधरी, सुनीता महाजन, शिक्षकेतर कर्मचारी अशोक बोरोले, आनंद महांगडे, चंद्रकांत वाघ यांनी सक्रिय सहभाग घेतला

. नूतन वर्षा कॉलनीतील विठ्ठल मंदिरात दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले. विद्यार्थीनींनी तुळस वृंदावन डोक्यावर घेऊन, नऊवारी साज घेऊन पाऊली खेळत आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी वारकर्‍यांच्या वेशभूषेत टाळ चिपळ्या वाजवत ठेका धरला.

शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिंडी दरम्यान विठ्ठल नामाचा गजर करत फुगड्या खेळताना फेर धरला. या कार्यक्रमाचा प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भरभरून आनंद लुटला. संपूर्ण परिसर टाळ-चिपळ्या आणि विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला होता. दिंडी विद्यालयात परत आल्यावर सर्वांनी साबुदाणा खिचडीचा आस्वाद घेतला.

डॉ.आचार्य विद्यालय

डॉ.अविनाश आचार्य प्राथमिक विभागात आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली. यावेळी पहिली ते चौथीचे विद्यार्थी वारकरी वेशात होते.छोट्या वारकर्‍यांनी हरी नामाचा जयघोष केला.विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल म्हणत पावलीत सहभाग घेतला. मुलींनी फुगडी खेळत दिंडीत रंगत वाढवली.डोक्यावर तुळशी घेऊन विठ्ठलाचे नामस्मरण केले.जय जय विठोबा रखुमाई चा जयघोष करण्यात आला.पदमनाभ पोळ व सई मुळे या विद्यार्थ्यांनी सुत्रसंचालन केले.दक्ष राजपूत याने आषाढी एकादशी ची माहिती सांगितली. मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. या नंतर दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली.विठ्ठल रुख्मिनी ची वेशभूषा यशश्री महाजन व सुदेश पाटील या विद्यार्थ्यांनी केली. प्रतिभा चौधरी, योगेश जोशी यांनी परिश्रम घेतले.

 न्यू. इंग्लिश मीडियम स्कूल
न्यू. इंग्लिश मीडियम स्कूल

न्यू. इंग्लिश मीडियम स्कूल

न्यू. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दिंडी काढून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. विठ्ठल, रुख्मीणी व वारकरी बनून विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले. दिंडीमध्ये मुलींनी तुळशीवृंदावन डोक्यावर घेतले होते. शाळेपासून ते गायत्री मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या दिंडीने सर्वांचेच लक्ष वेधले. या दिंडीमध्ये पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक झाड लावा. असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल

पलोड विद्यालय

काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात समन्वयिका संगीता तळले, स्वाती अहिरराव, अनघा सागडे यांच्या हस्ते विठुरायाच्या पालखीचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात विठू माऊलींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. शाळेचे विद्यार्थी वारकर्‍यांच्या वेशात उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पाऊली सादर केली.

पुष्कर बुवा व दर्शन बुवा या विद्यार्थ्यांनी किर्तन सादर केले. त् आषाढी एकादशीचे महत्व स्वरांगी कुलकर्णी,पुष्कर बुवा यांनी सांगितले. सूत्रसंचालन पलक कानडे, हर्षाली वीरकर या विद्यार्थिनींनी केले. स्वाती देशमुख यांनी विद्यार्थ्यांसोबत भक्ती गीत सादर केले.

तर बासरी वादन तन्मय चौधरी,भगवान बारी या विद्यार्थ्यांनी केले. संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत जनाबाई ,विठ्ठल, रुक्माई अशा विविध वेशभूषेत विद्यार्थी उपस्थित होतेे. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी अभंग व भक्ती गीत स्पर्धा घेण्यात आली.

स्पर्धेच्या प्रमुख शिल्पा मांडे तर परीक्षक म्हणून भारती माळी व स्वाती देशमुख यांनी काम पाहिले. पहिली व दुसरीसाठी कविता गायन स्पर्धा घेण्यात आली होती.

स्पर्धेच्या प्रमुख पूनम पाटील व परीक्षक म्हणून अनघा सागडे व मीनाक्षी देवताळे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रमुख भारती माळी, नम्रता कुलकर्णी, प्रदीप पाटील, संतोष शिरसाळे, मीनाक्षी देवताळू हे होते.यशस्वीतेसाठी रवींद्र भोईटे, योगेश पाटील यांनी परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com