तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह कर्मचार्‍यांनीच केला होता कैद्याचा खून

जळगाव जिल्हा कारागृहातील कैद्याच्या मृत्यप्रकरण ः तब्बल १४ महिन्यांनी पोलिसांची कारवाई
तत्कालीन कारागृह अधीक्षकांसह कर्मचार्‍यांनीच केला होता कैद्याचा खून

जळगाव -jalgaon

शहरातील शिवाजीनगर हुडको येथील चिन्या उर्फ रविंद्र रमेश जगताप Ravindra Ramesh Jagtap याचा न्यायालयीन कोठडीत Judicial custody असताना बेदम मारहाणीत मृत्यू Death झाल्याची घटना ११ सप्टेंबर २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी तब्बल १४ महिन्यांनी न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रर्स गायकवाड , तुरुंगधिकारी जितेंद्र माळी ,कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत यांच्याविरोधात नशीराबाद पोलिसात खूनाचा Murder in Nasirabad police गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशीरापर्यंत हा गुन्हा जिल्हापेठ पोलिसात वर्ग करण्याचे काम सुरु होते. संशयितांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणीही मयत चिन्याची पत्नी मीना जगताप यांनी केली आहे.

जिल्हा कारागृहात झालेल्या मारहाणीत चिन्या उर्फ रवींद्र जगतापचा मृत्यू झाला होता . कारागृह अधीक्षक पीटर्स गायकवाड, तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील , दत्ता खोत यांनी मारहाण केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे आरोप मयत चिन्या जगताप यांची पत्नी मीना जगताप यांनी केले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि नशिराबादच्या पोलीस निरीक्षकांना गुन्हा नोंदवावा म्हणून निवेदन दिले होते. चिन्यांचा शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा अहवालात त्याच्या शरीरावर मारहाणीच्या २२ जखमा असल्याचे नमूद आहे . यासंदर्भात तत्कालीन तुरुंग रक्षक मनोज जाधव यांनी २६ नोव्हेंबर २०२१ रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला होता. मनोज जाधव या घटनाक्रमाचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत . चिन्याला कशी मारहाण झाली याची माहिती त्यांनी आपल्या जबाबात दिली आहे . या आधीही न्यायालयीन चौकशीदरम्यान काही कारागृह बंदी यांनी या ५ आरोपींच्या विरोधात जबाब नोंदवलेले आहेत .

पोलिसांनी दाद न दिल्याने हायकोर्टात याचिका

कारागृह कायद्यानुसार ही घटना गंभीर असून पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यांनंतरच्या ४८ तासांच्या आत या आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करायला हवा होता मात्र तसे झाले नाही. पोलीस दाद देत नाहीत हे लक्षात आल्यावर मीना जगताप यांनी उच्च न्यायालयात याचिका ( क्रमांक - १७०६ / २०२० ) दाखल केली होती. या याचिकेची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता मयत चिन्याची पत्नी मीना जगताप यांच्या फिर्यादीवरुन तत्कालीन कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड , तुरुंगधिकारी जितेंद्र माळी , कारागृह पोलीस कर्मचारी अण्णा काकड, अरविंद पाटील, दत्ता खोत या पाच जणांविरोधात नशीराबाद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल मोरे हे करीत आहेत. शेवटचे वृत्त आले नशीराबादचे पोलीस उपनिरिक्षक अमोल मोरे यांच्यासह कर्मचारी गुन्ह्यासंदर्भातील कागदपत्रे घेवून जिल्हापेठ आले होते. तेव्हा हा गुन्हा जिल्हापेठ पोलिसात वर्ग करण्याचे काम सुरु होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com