कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तरच चळवळ जिवंत राहणार

कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तरच चळवळ जिवंत राहणार

राज्यस्तरीय आंबेडकरी अस्मिता पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी डॉ.सचिन जोंधळे यांचे प्रतिपादन

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

समाजात विविध क्षेत्रातील चळवळ (Movement in various fields) जिवंत रहावी म्हणून चळवळ जगविणारा कार्यकर्ता (Worker) सन्मानित (Honorable) झाला तरच कार्यकर्त्यांची चळवळ (Movement of activists) वृद्धीगत (Incremental) होईल. त्यासाठी गेल्या 20 वर्षांपासून आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानची (Appasaheb Vishwasrao Bhalerao Pratishthan) अखंड समाजसेवा करीत असून भालेराव प्रतिष्ठानची नावलौकिकात भर पडली आहे. आप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठान समाजसेवेचा वसा यापुढेही चळवळ जगविणार्‍यांना प्रोत्साहन देत राहील,असा आशावाद नागपूरचे डॉ.सचिन जोंधळे (Dr. Sachin Jondhale) यांनी व्यक्त केला.

रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठातर्फे 16 वा राज्यस्तरीय आंबेडकरी अस्मिता पुरस्कार वितरण सोहळयाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रातांधिकारी विनय गोसावी, सुप्रसिद्ध अभिनेता प्रा.हेमंत पाटील, भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वैभव सोनवणे यांनी वंदन गीत सादर केले. त्यानंतर तथागत बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.तसेच कालकथित राजेंद्र भालेराव यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत भालेराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद भालेराव यांनी केले.

हर्ष दीपक जोशी याने नीट परीक्षेत 99.56 टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल डॉ.जोंधळे यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शिवाजी अंडरग्राउंड इन भिमनगर मोहल्ला या नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे जालना यांना राजश्री शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.संबोधी देशपांडे पुणे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तर साहित्यिक भगवान नन्नवरे जळगाव यांना महात्मा जोतिबा फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पूर्णाकअती स्मृतीचिन्ह, सन्मान पत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरुप होते.

कालकथित राजेंद्र भालेराव व उषाताई सुरळकर यांच्या स्मृतीपित्यर्थ हे पुरस्कार देण्यात आले. महाराष्ट्राची हास्यजत्रा या मालिकेतील अभिनेता प्रा.हेमंत पाटील यांचा प्रतिष्ठतर्फे गौरव करण्यात आला.

सन्मानपत्राचे वाचन आम्रपाली सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक हरिश्चंद्र सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले. यशस्वीतेसाठी दीपक जोशी,विलास यशवंते, विठ्ठल भालेराव,भाऊराव सुरळकर,कुलदीप भालेराव, प्रबुद्ध भालेराव यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com