भुकेल्या मुलांच्या 'उदर' भरणा साठी अंगावरील सोने गहाण ठेवणाऱ्या 'रमाई' चे मातृत्व अव्दितीय : प्रा. पल्लवी कुलकर्णी

नूतन मराठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात सावित्रीबाई ते राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला
भुकेल्या मुलांच्या 'उदर' भरणा साठी अंगावरील सोने गहाण ठेवणाऱ्या 'रमाई' चे मातृत्व अव्दितीय : प्रा. पल्लवी कुलकर्णी

जळगाव jalgaon

आपल्या पतीच्या मित्राच्या भुकेल्या मुलांचं दुःख (plight of hungry children) पाहून स्वतःच्या अंगावरील सोनं गहाण ठेवणाऱ्या (Gold mortgage) रमाई चे मातृत्व (Motherhood of Ramai) आणि 'पति' ला च दागिणा (Husband's jewelry) मानणाऱ्या रमाई . खरोखरच भारतीय इतिहासात (Indian history) अजरामर(Ajramar) झाल्या आहेत. युगानु युगे (Yuganu Yuga) रमाईच्या त्यागाची महती सांगितली जाईल. असे प्रतिपादन प्रा. पल्लवी कुलकर्णी (Prof. Pallavi Kulkarni) यांनी केले.

Nutan Martha college logo
Nutan Martha college logo

निमित्त होते ते नूतन मराठा महाविद्यालय जळगाव आयोजित कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा सांगणाऱ्या व्याख्यानमालेचे.

नूतन मराठा महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती म्हणजेच 3 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान कर्तृत्ववान महिलांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांची यशोगाथा सांगणाऱ्या व्याख्यानमालेस सुरुवात झाली. या व्याख्यानमालेचे चौथे पुष्प प्रा पल्लवी कुलकर्णी यांनी आज गुंफले.

प्रा वंदना पाटील यांच्या मधूर आवाजात जिजाऊ वंदना झाली.

प्रा पल्लवी कुलकर्णी यांनी आपल्या विवेचनात रमाबाई आंबेडकर यांचा रमाबाई ते रमाई म्हणजेच भुकेल्या मुलांची दशा पाहून अंगावरचं सोनं सहज देवून टाकणाऱ्या आणि औदार्याची अतिउच्च सिमा गाठणाऱ्या मातृ हृदयी रमाई पर्यंतचा प्रवास, गोवऱ्या थापून आपल्या बॅरिस्टर होऊ पाहणाऱ्या नवऱ्याला पदरातील पैसे पुरुविणाऱ्या अर्धांगिनी, आणि बाबासाहेबांच्या अध्ययनात व्यत्यय येवू नये म्हणून भेटायला आलेल्या लोकांची परस्पर त्यांच्या कामाची दखल घेत,आस्थापुर्वक विचारपूस करत त्यांच्या कामाची विल्हेवाट लावणाऱ्या किंवा नोंद करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, चिंता, भुक,गरीबी, दुःख अवघे देशांतरा पाठवणाऱ्या, धाडसी योद्धा असा थक्क करणारा जीवनप्रवास डोळ्या समोर उभा केला.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. राहूल संदानशिव यांनी बाबासाहेबांच्या रमाई बद्दल च्या काही आठवणींना उजाळा दिला,त्यात रमाईंना काही महिला जेव्हा विचारायचे की तुम्ही बॅरिस्टरच्या पत्नी असून अंगावर एकही डागिना नाही तेव्हा त्या अभिमानाने सांगत, माझा खरा डागिना डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत.

रमाई ला काहीच देवू शकलो नाही अशी डॉ बाबासाहेब यांनी व्यक्त केलेली खंत आणि रमाई मुळेच संविधान लिहू शकलो असे बाबासाहेबांनी रमाई बद्दल काढलेले गौरवोद्गार अशा अनेक आठवणींना उजाळा देत डॉ राहूल संदानशिव यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाचा समारोप केला.

deshdoot logo
deshdoot logo

सुत्रसंचलन प्रा. वंदना पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रिना पवार यांनी केले.

सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य प्रा. एन. जे .पाटील, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र देशमुख, उपप्राचार्य प्रा. आर. बी. देशमुख , अध्यक्ष प्रा. डॉ. राहूल संदानशिव, कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. डॉ. इंदिरा पाटील समवेत सर्व शाखेतील विभाग प्रमुख, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com