निर्बिजीकरणाचा गोरखधंदा

निर्बिजीकरणाचा गोरखधंदा

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

जळगाव शहरात मोकाट आणि भटक्या (stray dogs) कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेने (corporation) निर्बिजिकरण (De-sterilization) करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नंदूरबार (Nandurbar) येथील नवसमाज निर्माण बहुउद्देशिय संस्थेला(Navasamaj Nirman Multipurpose Institution) मक्ता देण्यात आला आहे. गेल्या सव्वा महिन्यात 572 मोकाट कुत्र्यांवर निर्बिजिकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला असलातरी मक्तदाराचा हा कागदी खेळ (Paper games) असल्याचेही बोलले जात आहे. तसेच निर्बिजिकरणाचे काम प्रभावीपणे होत नसल्याचेही सुर उमटू लागले आहे. निर्बिजिकरणासाठी एका कुत्र्यामागे 938 रुपये महापालिकेकडून दिले जात असून, निर्बिजिकरणाची संख्या केवळ कागदोपत्री दाखवली जात असल्याने या मक्त्यात आर्थिक घोटाळा (Financial scam) असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जळगाव शहरात मोकाट आणि भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील प्रत्येक भागांमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मनपा प्रशासनाने निर्बिजिकरण करण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार नंदूरबार येथील नवसमाज निर्माण बहुउद्देशिय संस्थेला 17 ऑगस्ट 2021 रोजी कार्यादेश देण्यात आले आहेत. तीन वर्षांसाठी मक्ता देण्या आला असून, मक्तेदाराने 23 ऑगस्टपासून कामाला सुरुवात केली.

दररोज 30 कुत्र्यांचे निर्बिजीकरण?

शहरातील मेहरुण परिसरात असलेल्या टी.बी. हॉस्पिटलच्या जागेवर निर्बिजिकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दररोज किमान 30 कुत्र्यांवर निर्बिजिकरणाची शस्त्रक्रिया केली जात असल्याचा दावा मक्तेदाराकडून करण्यात येत आहे. 23 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या सव्वा महिन्याच्या कालखंडात 572 कुत्र्यांवर निर्बिजिकरणाची शस्त्रक्रिया केल्याचा दावा केला जात असलातरी, ही केवळ कागदोपत्री संख्या दर्शविण्यात येत असल्याची शंका निर्माण होत आहे. एका कुत्र्यावर शस्त्रक्रियेसाठी किमान एक ते दीड तास कालावधी लागत असेलतर, दिवसभरात 30 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया कशी काय होवू शकते? असा सवाल उपस्थित होत असल्याने यात गौडबंगाल असल्याचे दिसून येत आहे.

एका पिंजर्‍यात दोन कुत्रे

मनपाच्या टी.बी. हॉस्पिटलमध्ये निर्बिजिकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ठिकाणी 120 पिंजरे असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र एका पिंजर्‍यात एकच कुत्रा न ठेवता दोन-दोन कुत्रे ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

तज्ज्ञांचा अभाव

निर्बिजिकरणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी चार डॉक्टर असल्याचा दावा केला जात असलातरी तज्ज्ञ पशुवैद्यकिय अधिकार्‍यांचा अभाव आहे. निर्बिजिकरणाचे काम प्रभावीपणे होत नसल्याने शस्त्रक्रियेनंतर कुत्रे दगावण्याचे प्रमाण वाढले असल्याचे प्राणी प्रेमींकडून बोलले जात आहे.

मनपा प्रशासनाने मोकाट कुत्र्यांवर निर्बिजिकरणासाठी मक्ता दिलेला आहे. निर्बिजिकरण शस्त्रक्रियेनंतर मोकाट कुत्र्यांचे हाल होत असनू, दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे निर्बिजिकरणाची शस्त्रक्रिया योग्य पध्दतीने केली जात नसल्याची शक्यता आहे.
हर्षल भाटीया, संचालक, पशुपापा अ‍ॅनिमल प्रोटेक्शन, असोसिएशन
शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेवून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी निर्बिजिकरणाचा मक्ता देण्यात आला आहे. त्या ठिकाणी 120 पिंजरे असून पुन्हा पिंजरे वाढविण्याची सूचना बांधकाम विभागाला दिली आहे. तसेच त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.
पवन पाटील, सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग, मनपा
मोकाट कुत्र्यांवरील निर्बिजिकरणाचे काम योग्य पध्दतीने सुरु आहे. शस्त्रक्रियेनंतर ओळख पटावी यासाठी कानाला व्ही आकार देण्यात येत असून, बेल्ट लावला जात आहे. त्या बेल्टवर शस्त्रक्रियेच्या तारखेचे टॅग लावले जाते. दररोज 30 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जात असून, 30 सप्टेंबरपर्यंत 572 कुत्र्यांवर निर्बिजिकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
गौतम शिरसाठ, मक्तेदार, नवसमाज निर्माण बहुउद्देशिय संस्था, नंदूरबार

Related Stories

No stories found.