जळगावच्या महापौरांना मिळणार शासकीय निवासस्थान

जळगाव महापालिकेच्या महासभेत सर्वानुमते ठराव मंजूर
 जळगावच्या महापौरांना मिळणार शासकीय निवासस्थान

जळगाव- jalgaon

राज्यातील अन्य महापालिकांच्या (Municipal Corporation) धर्तीवर जळगाव महानगरपालिकेकडून (Jalgaon Municipal Corporation) महापौरांना (mayor) शासकीय निवासस्थान (Government residence) देण्यात यावे. यासाठीचा प्रस्ताव (Proposal) महासभेत (General Assembly) ठेवण्यात आला होता. दरम्यान, हा ठराव सर्वानुमते मंजूर (Approved) करण्यात आला आहे. जोपर्यंत निवासस्थानासाठी जागा आणि बांधकाम होणार नाही, तोपर्यंत रिंगरोड परिसरातील उपायुक्तांसाठीचे जे निवासस्थान आहे. ते देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

मनपाची महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दूरदृष्य प्रणालीव्दारे पार पडली. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीष कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. राज्यातील महापालिकेच्या महापौरांना शासकीय स्वतंत्र निवासस्थान आहेत. मात्र, २००३ पासून अस्तित्वात आलेल्या जळगाव महानगरपालिकेचे महापौरांचे निवासस्थान नाही. त्यामुळे महापौरांसाठी शासकीय निवास्थान बांधण्यात यावा.

यासंदर्भातील प्रस्ताव सोमवारी झालेल्या महासभेत ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी विषय पटलावर ठेवला होता. दरम्यान, या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे. जोपर्यंत महापौरांच्या शासकीय निवासस्थानाचे बांधकाम होणार नाही, तोपर्यंत रिंगरोडवरील शासकीय निवास्थान महापौरांसाठी हस्तांतरीत करण्यात यावा. अशी भूमिका नितीन लढ्ढा यांनी मांडली.

या भूमिकेला सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन दिले. दरम्यान, भाजपच्या नगरसेविका ऍड. शुचिता हाडा यांनीही या निर्णयाचे स्वागत करत पुढचा महापौर भाजपचाच असल्याचे सांगताच विरोधक असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनीही त्यांच्या वक्तव्याला मनमुरादपणे दाद दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com