तेरा महिन्यात पैसे दुप्पटच्या आमिषाने व्यावसायीकाला 32 लाखात गंडविले

शिंपल्याच्या शेतीमध्ये पैसे गुंतविण्याचे आमिष; जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल
तेरा महिन्यात पैसे दुप्पटच्या आमिषाने व्यावसायीकाला 32 लाखात गंडविले

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शिंपल्यांपासून मोती (Pearls from mussels) तयार करण्याच्या शेतीमध्ये पैसे गुंतविले तर 13 महिन्यांमध्ये दुप्पट पैसे (Double the money) मिळणार असल्याचे आमिष दाखवित इंडोपर्ल या बनावट कंपनीतील सहा जणांनी महेश तुकाराम भोळे (मूळ रा. असोदा रा.सदोबा नगर) यांना 31 लाख 50 हजार रूपयात गंडविल्याचा (Fraud) प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

तेरा महिन्यात पैसे दुप्पटच्या आमिषाने व्यावसायीकाला 32 लाखात गंडविले
पतीच्या अपघाती निधनाचा धक्का पत्नीने केली आत्महत्या

जळगाव तालुक्यातील असोदा येथील महेश भोळे हे ह. मु. सदोबा नगरात वास्तव्यास आहे. त्यांना औरंगाबाद येथील एका मित्राने आमच्या भागात शिंपल्यांपासून मोती तयार करण्याची शेती केली जाते. त्यांच्या बर्‍याच कंपन्या असून दि. 10 ते दि. 13 फेब्रुवारी दरम्यान शेतीचे प्रदर्शन भरणार आहे. त्यात मोतीची शेती कशी करतात याचे मार्गदर्शन मिळेल असे सांगितले होते. त्यानुसार महेश भोळे यांनी बारामती येथे झालेल्या शेती प्रदर्शनाला भेट दिली. त्यात शिंपल्यांपासून मोती कसे तयार करावेत, या बद्दलचे माहिती देणारे अरूण नागोराव आंभोरे यांचा स्टॉल होते. त्यांनी भोळे यांना व्यावसायाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर आपण जळगावात येणार असून तेव्हा संपूर्ण पैसे तयार ठेवा असे सांगिले. त्यानुसार दि. 20 एप्रिल रोजी अरुण आंभोरे हा विनोद बाहेकर, आकाश आठल्ये याच्यासह (एमएच 20 सीजी 5111) क्रमांकाच्या कारने जळगावात आला.

तेरा महिन्यात पैसे दुप्पटच्या आमिषाने व्यावसायीकाला 32 लाखात गंडविले
Visual Story # नुसरतच्या या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर घातलीय धुमाकूळ
तेरा महिन्यात पैसे दुप्पटच्या आमिषाने व्यावसायीकाला 32 लाखात गंडविले
धक्कादायक : अमळनेरमधुन दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेले
तेरा महिन्यात पैसे दुप्पटच्या आमिषाने व्यावसायीकाला 32 लाखात गंडविले
VISUAL Story: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार पाहाल तर प्रेमातच पडाल !

डबल पैसे मिळणार असल्याचे दाखविले आमिष

जळगावात आलेल्या तिघांनी महेश भोळे यांची भेट घेतली. तसेच त्यांना तुमच्याकडील वातावरण मोतीच्या शेतीसाठी पुरक नाही, त्यामुळे तुम्ही कंपनीने अधिग्रहीत केलेल्या तलावात शिंपल्यांपासून मोती तयार करण्याची शेती केले जाते. त्यात पैसे गुंतवा असे सांगित तुम्ही गुंतविलेले पैसे 13 महिन्यात डबल मिळतील असे सांगून इतरांनी गुंतवणूक केल्याबाबत कागदपत्रे व चेक दाखविले. त्यावर भोळे यांनी विश्वास ठेवून 31 लाख 50 रूपये गुंतवणूक केली. त्यापोठी त्यांना दोन कोरे चेक देण्यात आले व लवकरच करारनामा करू असे देखील सांगितले.

तेरा महिन्यात पैसे दुप्पटच्या आमिषाने व्यावसायीकाला 32 लाखात गंडविले
VISUAL STORY : वाणी कपूरच्या ग्लॅमरस लुकवर आहेत सारेच फिदा
तेरा महिन्यात पैसे दुप्पटच्या आमिषाने व्यावसायीकाला 32 लाखात गंडविले
Visual Story : हास्य जत्रेतील प्राजक्ताचा गुलाबी लुक पाहाल तर तुम्ही व्हाल आशिक…

जागा मालकालाही घातला गंडा

करारनामा करण्यासाठी महेश भोळे यांनी अरुण आंभोरे याला फोन केला. परंतु त्याच्याकडून टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे भोळे यांना संशय आल्याने त्यांनी औरंगाबाद गाठून कंपनीत प्रत्यक्ष जाऊन पाहिले. मात्र कंपनीत कुणीही दिसून आले नाही तसेच याठिकाणी अनेक जण चकरा मारत असल्याची माहिती त्यांना मिळाली. याचवेळी जागा मालक देशपांडे हे भोळे यांना भेटले. त्यांनी ही जागा कंपनीला भाड्याने दिली आणि पैसे देखील घेवून त्यांची देखील फसवणुक केल्याचे भोळे यांना समजल्याने त्यांना धक्काच बसला.

तेरा महिन्यात पैसे दुप्पटच्या आमिषाने व्यावसायीकाला 32 लाखात गंडविले
VISUAL STORY : खान्देश कन्येची अधुरी कहानी लेकाचे आयुष्य झाले सुने सुने
तेरा महिन्यात पैसे दुप्पटच्या आमिषाने व्यावसायीकाला 32 लाखात गंडविले
पं.स.चे माजी सभापती जनार्दन पाटील  अन् राष्ट्रवादीचे सुरज नारखेडे यांच्यात खडाजंगी

यांच्याविरूध्द गुन्हा दाखल

महेश भोळे यांना आपली फसवणुक झाल्याचे कळताच त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अरूण नागोराव आंभोरे, मंदा अरूण आंभोरे, दीपाली अरूण आंभोरे, राहुल शेळके, विनोद बाहेकर, आकाश आठल्ये (रा.औरंगाबाद) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक किशोर पवार करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com